थंडीला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्याला थंडीचा महिना म्हणतात. रखरखीत उन्हाळ्याऐवजी लोकांना हिवाळा खूप आवडतो. लोकांना या सीझनमध्ये लांबचा प्रवास करायला आवडते. लोक हिवाळा खूप एन्जॉय करतात. हिवाळा हा ऋतू अनेकांचा आवडता असला तरीही या काळात अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. तापमानात घट झाल्याचा परिणाम लोकांच्या मनःस्थितीवर आणि आरोग्यावर होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते.
बदलत्या ऋतूत लोक आजारी पडतात कारण तापमानातील बदलामुळे विषाणू वाढतात जे नंतर रोग पसरवतात. हिवाळ्याच्या हंगामात घसा खवखवणे उद्भवू शकते, जे नंतर गंभीर संसर्गामध्ये बदलू शकते ज्यामुळे अन्न किंवा पाणी गिळण्याचा त्रास होऊ शकतो. तसेच थंडी असल्याने तुमचे शरीर देखील थंड पडते आणि अशा स्थितीत साधे आजारही बरे करणे कठीण होते. त्यामुळे हिवाळ्यात सावधगिरी बाळगणे आणि हंगामी आजारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत तापमानात घसरण झाल्यामुळे कोणते आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात हे जाणून घ्या.
( हे ही वाचा: Uric Acid: रात्रीच्या जेवणात मांसाहारासह ‘या’ ५ गोष्टींचे सेवन केल्यास वेगाने वाढू शकते युरिक ऍसिड; त्वरित खाणे सोडा)
सर्दी
हिवाळ्यात सर्दी ही अशी एक समस्या आहे जी लोकांना जास्त त्रास देते. या ऋतूतील कोरडे आणि थंड हवामान रिनोव्हायरसच्या वाढीसाठी अनुकूल काळ आहे. रिनोव्हायरस हा सर्दीचा सामान्य विषाणू आहे जो हिवाळ्यामध्ये अधिक त्रासदायक असतो. हिवाळ्यात होणारी थंडी ४-५ दिवस त्रास देते. सर्दी यापेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांना दाखवण्याची गरज असते.
उपाय
विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखणे हा सर्दीपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. वारंवार हात धुणे आणि सर्दी झालेल्या लोकांच्या संपर्कात येणे टाळणे फार महत्वाचे आहे. जर कुटुंबातील सदस्य आजारी असेल तर त्याच्यापासून दूर रहा.
( हे ही वाचा: हृदयविकाराच्या रुग्णांना अंडी खाल्ल्याने त्रास होतो का? जाणून घ्या याचे सेवन किती आणि कसे करावे)
सांधेदुखी
थंडी वाढल्याने सांधेदुखीची समस्या वाढताना दिसते. या ऋतूमध्ये सांधेदुखीच्या रुग्णांच्या सांध्यातील जडपणा अधिक वाढतो, त्यामुळे उठणे-बसणे कठीण होऊन जाते. नारायण हेल्थ ट्रस्टच्या म्हणण्यानुसार तापमानात घट झाल्यामुळे सांधेदुखी होते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे सांध्याभोवतालच्या रक्ताचे तापमान खूप कमी होते आणि सांध्यामध्ये जडपणा आणि दुखण्याच्या तक्रारी होतात.
उपाय
हिवाळ्यात सांधेदुखी टाळायची असेल तर शरीराला जास्तीत जास्त उबदार ठेवा. शरीर उबदार ठेवण्यासाठी उन्हात बसा. तेलाने सांधेदुखीची मालिश करा. शरीर नेहमी सक्रिय ठेवा त्याचबरोबर सांध्यातील कडकपणा कमी करण्यासाठी चालणेंह उत्तम पर्याय आहे.
( हे ही वाचा: यूरिक अॅसिड वाढल्यास शरीर देऊ लागते संकेत; गंभीर आजार होण्यापूर्वी करा ‘हे’ उपाय)
निमोनिया त्रास देऊ शकतो
जसजशी थंडी वाढत जाते, तसतसा न्यूमोनिया अत्यंत त्रासदायक ठरू शकतो. न्यूमोनिया हा एक जीवघेणा आजार आहे ज्यामध्ये व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण फुफ्फुसांमध्ये पसरते आणि ते द्रवपदार्थाने भरते. न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. न्यूमोनियाचे जंतू खोकताना, शिंकताना किंवा संक्रमित वस्तूंना स्पर्श केल्याने आणि नंतर तोंडाला किंवा नाकाला स्पर्श केल्याने पसरतात.
उपाय
हा रोग टाळण्यासाठी, आपण स्वत: ला थंडीपासून वाचवावे. नियमित चालणे किंवा व्यायाम करा जेणेकरून शरीर उबदार राहील. बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी तुम्ही लसही घ्यावी. याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. शुगरच्या रुग्णांनी हिवाळ्यात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.