साहित्य : साहित्य : वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी, हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी, चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा झ्र् एक, तीळ – एक टेबल स्पून, खोवलेलं ओलं खोबरं – अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे, मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा, तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे, गरम मसाला पावडर – एक चमचा
कृती : वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा. भांडय़ात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या. हिंग, हळद घाला. भाज्या घालून छान परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा. गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.भोगीच्या दिवशी ही भाजी करतात.बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com