Makar Sankranti 2022 Exact Date : हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हणून म्हटलं जातं. या दिवशी सूर्यदेव उत्तरायण असतात, असं म्हणतात. उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्याचवेळी दक्षिणेत आसाम आणि पोंगलमध्ये बिहू हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येत असली तरी याची तिथी मात्र निश्चीत नसते. मकर संक्रांती तिथी कधी १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येत असते. दर ७६ वर्षांनी ही तारीख एक दिवसाने पुढे जाते. काही वर्षापूर्वी मकर संक्रांती १० जानेवारी रोजी साजरी होत असे. ही तारीख दर ६ वर्षांनी पुढे सरकत आता ती १४ जानेवारीपर्यंत आली आहे. काही वर्षांनी ती १५ जानेवारी देखील होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या वर्षी दोन पंचांगांमध्ये सूर्याचा मकर राशीतील भ्रमणाचा काळ असणार आहे. १४ जानेवारीला जेव्हा सूर्य मकर राशीत राशीत प्रवेश करेल तेव्हा संध्याकाळची वेळ असणार आहे. संक्रांतीचा पवित्र काळ सूर्य मकर राशीत प्रवेश करण्यापूर्वी ६ तास आणि त्यानंतर ६ तास चालतो असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे मकर संक्रांतीची तिथी १५ जानेवारीला जाते. त्यामुळे यंदाच्या वर्षी मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे, याबाबत लोकांचा गोंधळ उडालाय. काहीजण यावर्षी संक्रांत 14 जानेवारीला असल्याचं सांगत आहेत. तर काही जण १५ जानेवारीला मकरसंक्रांती असल्याचा दावा करत आहेत. तुमचा सुद्धा या तारखेबाबत गोंधळ उडाला असेल तर इथे जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ वेळ….

आणखी वाचा : Makar Sankranti 2020 : लहान मुलांचे का केले जाते बोरन्हाण? अशी करा तयारी; वाचा सविस्तर

यंदाच्या वर्षी सूर्य मकर राशीत १४ जानेवारी (शुक्रवार) रोजी दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी हा पुण्यकाळ संपत आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश सूर्यास्तापूर्वी होत आहे, म्हणून मकर संक्रांतीची सर्वोत्तम तारीख १४ जानेवारी मानली जात आहे.

मुहूर्त चिंतामणी ग्रंथानुसार मकर संक्रांतीचा शुभ काळ सूर्याच्या शुभ मुहूर्ताच्या १६ तास आधी आणि १६ तासांनंतरचा आहे. यावेळी पुण्यकाल १४ जानेवारीला सकाळी ७.१५ वाजल्यापासून सुरू होईल ते संध्याकाळी ५.४४ पर्यंत चालेल. त्यात स्नान, दान, नामजप करता येतो. दुसरीकडे, स्थिर लग्नचा विचार केल्यास, म्हणजे महापुण्य काल मुहूर्त ९ ते १०.३० पर्यंत राहील. यानंतर दुपारी १.३२ ते ३.२८ वाजेपर्यंत असेल.

आणखी वाचा : Makar Sankranti 2022 Messages: मकर संक्रांतीनिमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Wishes, Images, Quotes

२९ वर्षांनंतर जुळून येतोय ‘हा’ दुर्मिळ योग
यंदाच्या वर्षीच्या मकर संक्रांतीवर काही विशेष योगायोग घडत आहेत. यावेळी सूर्य आणि शनि एकत्र मकर राशीत असतील. हे संयोजन अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी १९९३ मध्ये या योग घडला होता. त्यानंतर २९ वर्षांनी हा दुर्मिळ योग पुन्हा घडणार आहे.

आधी संक्रांत की किंक्रांत?
एकूण तीन दिवसांचा हा सण साजरा करण्यात येतो. या तिन्ही दिवसांचे महत्त्व देखील वेगवेगळे आहेत. संक्रांतीच्या अगोदरचा दिवस हा भोगी म्हणून साजरा करण्यात येतो. हिवाळ्यात येणारा पहिला सण हा भोगी असतो. ऐन थंडीच्या दिवसात येणाऱ्या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांनी बनलेली भोगीची भाजी केली जाते. सोबतच बाजरीची तीळ घालून भाकरी केली जाते. असा चविष्ठ बेत या दिवशी केला जातो.

१४ जानेवारी रोजी संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी संक्राती या देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी मान्यता आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. किंकरआसुर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. या दिवशी कोणाशी वाद देखील घालू नये, असं म्हटलं जातं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2022 the exact date to celebrate shubh muhurat khichdi panchang punyakala pujan vidhi snaan daan prp