Gift Ideas for Makar Sankranti Haldi Kunku: नवीन वर्ष २०२४ ची सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात पहिलाच येणारा सण म्हणजे मकरसंक्रांती. गेल्या दोन वर्षांनुसार यंदाही मकर संक्रांती १५ जानेवारीला आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं. उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण खास करुन महिलांचा असतो. कारण, मकर संक्रांत सुरु झाल्यानंतर १५ दिवस हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरु होतो. संक्रांतीला महिला, सुवासिनी एकत्र येऊन हळदी कुंकवाचा सण साजरा करतात, एकमेकींना वाण देऊन, तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात.  तर, यावेळच्या संक्रांतीनिमित्त तुम्हालाही महिलांना वाण द्यायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांसाठी हटके पर्याय पाहा

१. कुंकवाचा करंडा 

यंदाच्या मकरसंक्रांतीला तुम्ही सुवासिनींना कुंकवाचा करंडाही देऊ शकता. बाजारात मिळणाऱ्या कुंकवाच्या करंड्याच्या वेगवेगळ्या डिझाईन तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. 

२. टिकल्याचे पाकीट (bindi)

हळदीकुंकवाच्या वाणासाठी तुम्ही महिलांना टिकल्याचे पाकीट देऊ शकता. आपल्याकडे येणाऱ्या बहुसंख्य महिलांना कोणत्या प्रकारच्या टिकल्या आवडतात, ते ठरवा आणि ते वाण म्हणून सुवासिनींना देऊ शकता.

३. तुळशीचं रोपटं

तुळस ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. ज्या घरात तुळस आहे तिथे लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देऊ शकता.

(हे ही वाचा : रोज दुधाची पिशवी फोडताना तुम्हीही ‘अशी’ चूक करता का? ‘हा’ VIDEO एकदा पाहाच!)

४. पाण्याच्या बॉटल्स

यंदाच्या मकरसंक्रांती तुम्ही महिलांना पाणी पिण्याच्या बॉटल्सही देऊ शकता. तुम्हाला स्वस्तात बाजारात पाण्याच्या बॉटल्स मिळू शकतात.

५. कापडाच्या पिशव्या 

प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे मकरसंक्रांत निमित्त महिलांना या टिकाऊ व आकर्षक कापडाच्या पिशव्या वाण म्हणून भेट देता येऊ शकते.

६. बांगड्या

बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात, हे सर्वांना माहिती आहेच, त्यामुळे तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकतात. हा चांगला पर्याय आहे.

७. रेसिपी बुक

महिलांना स्वयंपाकासाठी मदत करणारे एखादं छानसं रेसिपी बुक वाण म्हणून देवू शकता. यामुळे सुवासिनींना आनंदी होऊ शकतो.

८. मेकअप किट 

सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही सुवासिनींना मेकअप किट देखील वाण म्हणून देऊ शकता. 

९. कलरफुल पर्स

महिलांसाठी पर्स फार उपयुक्त आहे. हे आपण सर्वांना माहिती आहेच. त्यामुळे तुम्हाला छान कलरफुल पर्सही वाण म्हणून भेट देता येऊ शकते.

१०. कॅलेंडर

नवीन वर्ष सुरू झाल्याने हळदीकुंकवाच्या वाणासाठी वाण म्हणून तुम्ही कॅलेंडरही देऊ शकता.

अशाप्रकारे हळदीकुंकवाच्या वाणासाठी वरील भन्नाट आयडिया नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2024 ten unique haldi kumkum gift ideas see more pdb
Show comments