Makar Sankranti Ukhane Marathi : मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण. या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे. दरवर्षी हा सण १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.
या सणाला सूर्य देवाची आराधना केली जाते. तिळगुळ देत एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास असतो. मकरसंक्रांतीनिमित्त विवाहित महिला हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला घरी इतर विवाहित महिलांना आमंत्रित करतात. त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरतात. या दरम्यान आणखी एक लोकप्रिय प्रथा पाळली ती म्हणजे उखाणा घेण्याची. ओटी भरताना महिला एकमेकींना उखाणा विचारतात आणि सांगतात. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा घेतात. तुम्हाला उखाणा येतो का? जर नाही तर टेन्शन घेऊ नका कारण आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांती निमित्त हटके काही उखाणे सांगणार आहोत.

मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड,
…राव माझे पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.

लग्नानंतर मकर संक्रातचा पहिला सण करते साजरा,
…रावांचा स्वभाव, आहे फार लाजरा.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
…रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मला

चांदीच्या दिव्यात लावली तूपाची वात
… रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरूवात

हेही वाचा : रोज सकाळी उठताच आवळ्याचे पाणी प्यायल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे

तिळासारखा स्नेह नांदावा आणि गुळासारखा असावा गोडवा …… रावांचे नाव घेत सुखी संसाराचा मागते जोगवा

महालक्ष्मीच्या देवळात आरती सुरू झाली मंद सुरात, …रावांचे नाव घेते मी मात्र तोऱ्यात

ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,
…रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी.

हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून,
सर्वजण विचारतात ….हॅंडसम, भेटले कुठून.

मकर संक्रांत म्हणून, पतंगाने आकाशात घेतली भरारी,
मी घेतली …रावांसोबत, आयुष्यभराची सवारी

रुक्मिणीने पण केला
श्रीकृष्णाला वरीन
…रावांच्या जीवावर
संक्रांत आनंदाने करिन

जाई जुईच्या फुलांपेक्षा
शोभून दिसते शेवंती,
… रावांना सुखी ठेवा
हीच देवाला विनंती.

हेही वाचा : Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व

तिळगुळ घेऊ आणि
गोड गोड बोलू,
… राव आहेत हौशी
खोटं कशाला बोलू.

पारिजाताच्या झाडाखाली
फुलांचे सडे,
… रावांचे नाव घ्यायला
मी नेहमी पुढे.

महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,
…रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.

पुराणपोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ,
…..रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

राठ मोळे सण, आहेत किती छान,
…..रावांची पत्नी असण्याचा, मला आहे अभिमान

Story img Loader