उत्तम व्यायम केल्यानंतर आपल्या ऊर्जेच्या पातळीमध्ये भर घालण्यासाठी चांगलं काही तरी खाणं गरजेचं आहे. पोस्ट वर्कआउट काही तरी हेल्दीच खाणे गरजेचं आहे. हेल्दीसोबत तृप्त होण्यास मदत करेल अशी काही तरी डीश हवीच. तज्ञांचे म्हणणे आहे की पुरेसे पोषण शरीराच्या पोषक घटकांची भरपाई करण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावू शकते.याचा अर्थ असा की एखाद्याने व्यायम केल्यानंतर समाधानकारक आणि उच्च पोषण मूल्य असणाऱ्या डीशची निवड केली पाहिजे.
व्यायमानंतरच्या स्नॅकसाठी काय बनवायचे याबद्दल तुम्ही गोंधळलेले असाल तर, ही एक सोपी रेसिपी आहे जी चवदार आहे आणि तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय ट्रॅकवर ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक प्रोटीनही प्रदान करेल.आहारतज्ञ पूजा बोहरा यांनी रेसिपी शेअर केली आहे.
साहित्य
१/२ कप – घरगुती दुधाचे पनीर
१/२ कप – डाळिंब
चवीनुसार – मीठ आणि काळी मिरी
कृती
एका भांड्यात घरगुती मिल्क पनीर घ्या.
त्यावर डाळिंबाचे दाणे घाला.
पुढे त्यावर चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला.
आणि व्यवस्थित मिक्स करा. सोप्पी आणि सहज डिश तयार आहे.
घरगुती पनीर तुमच्या पोषणविषयक गरजा कशा पूर्ण करते?
प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत म्हणून, पनीर पौष्टिकतेच्या गरजा पूर्ण करते. पनीर हे पोटॅशियम आणि सेलेनियममने देखील समृद्ध आहे. कॅल्शियमचा एक समृद्ध स्त्रोत आहे जो हाडे मजबूत करण्यास मदत करतो, वर्कआउट नंतर ते एक आयडीयल स्नॅक बनवते.
तज्ञांच्या मते, स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून ओळखले जाणारे एक उच्च प्रथिने स्नॅक आणि स्नायूंचे प्रमाण वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.
व्यायाम केल्यानंतर ही डीश नक्की ट्राय करा.