दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी किंवा दीपावली काही दिवसांवर आली आहे. सगळीकडे दिव्यांची रोषणाई होत आहे. खरेदीपासून, साफसफाईपर्यंत सर्व प्रकारची तयारी एकदम जोरदार सुरू आहे. दिवाळी हा सण प्रभू श्री राम जेव्हा आपली पत्नी सीता व बंधू लक्ष्मणासोबत १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा साजरी केली गेली होती, असं म्हणतात. दिवाळीत आपण नवीन कपडे घालून धनाची देवता म्हणजेच लक्ष्मी मातेची पूजा करतो, फटाके उडवतो, फराळ करतो, मित्रपरिवाराच्या घरी फराळ घेऊन जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशात तुम्हाला तुमच्या घरी दिवाळी पार्टी ठेवायची असेल, तर तुम्ही काय काय करू शकता ते पाहा :

दिवाळी पार्टीसाठी काय काय करावं?

१. सजावट

कुणालाही घरी बोलवताना, खास करून सणासुदीच्या काळात जर पाहुण्यांना बोलावणं केलं असेल, तर घर उत्तम पद्धतीने सजवावे. सजावट हा कुठल्याही कार्यक्रमाचा किंवा पार्टीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. दिवाळी पार्टीसाठी तुम्ही नाजूक फेरी लाईट्स, कंदील, पणत्या, दिवे, रांगोळी इत्यादी गोष्टींनी घराची सजावट करू शकता.

हेही वाचा : दिवाळीसाठी २० मिनिटांत बनवा खास चॉकलेट पिस्ता बर्फी; पहा काय आहे प्रमाण

२. कपडे

कपड्यांसाठी विशिष्ट प्रकारची थीम व स्पर्धा ठरवल्यास लोकांच्या मनात पार्टीबद्दल उत्सुकता वाढेल. वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचे कपडे पाहुणे घालून आल्याने पार्टीला एकदम सुंदर आणि छान लूक येतो. शेवटी तुम्ही जर सर्वात चांगलं तयार होऊन येणाऱ्या व्यक्तीला छोटं बक्षीस दिलंत, तर पार्टीत अजून मजा येईल.

३. खाण्यापिण्याचे पदार्थ

पार्टी किंवा समारंभांमध्ये विशेष आकर्षण असतं ते म्हणजे खाद्यपदार्थांचं. त्यामुळे पार्टीसाठी तुम्ही कोणते पदार्थ निवडता हे महत्वाचं ठरतं. अशा वेळेस सगळ्यांना आवडतील असे पदार्थ निवडून, त्यात वेगवेगळे प्रकार ठेवावे.

४. आठवणींसाठी फोटो हवेच

पार्टी, समारंभ लहान असो वा मोठा; आठवण म्हणून प्रत्येक क्षणाचे फोटो तर सगळ्यांनाच हवे असतात. त्यामुळे पार्टीसाठी एखादा फोटोग्राफर बोलवावा. पार्टीचे स्वरूप लहान असल्यास घरातच एखादा फोटो बूथ किंवा सेल्फी पॉईंट तयार केल्याने पार्टीची शोभा वाढेल.

५. भेटवस्तू

दिवाळीमध्ये आपण प्रत्येकासाठी काही तरी भेटवस्तू घेतो. त्यामुळे पार्टीसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास भेटवस्तू घ्यायला अजिबात विसरू नका. भेटवस्तू म्हणून तुम्ही फळांची गिफ्ट बास्केट, मिठाईचा डबा, एखादी शोभेची वस्तू या प्रकारच्या गोष्टी घेऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make diwali 2023 memorable host a diwali party at your home use this 5 tips dha
Show comments