दिवसाची सुरुवात आरोग्यदायी होण्यासाठी आपण काय खावे, काय प्यावे यासाठी अनेकांचे सल्ले घेतो; विविध ठिकाणांहून माहिती घेत असतो. त्यामधल्या काही गोष्टी या तुमच्यासाठी, पोटासाठी फायदेशीर असतात, मात्र काही पदार्थांनी गॅस, मळमळ, पित्त यांसारखे त्रास अचानकपणे उद्भवतात. असे तुम्हाला कधी जाणवले आहे का? मग या लहानमोठ्या तक्रारी आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात का?

तर याचे उत्तर ‘हो’ असे आहे. सकाळी रिकाम्या किंवा रिकाम्यापोटी काही ठराविक पदार्थ खाल्ल्याने जर तुमच्या पोटामध्ये गॅस, पित्त यांसारख्या गोष्टींचा त्रास जाणवत असल्यास, तुम्ही ते पदार्थ खाणे टाळावे असा तो संकेत असतो, अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखातून समजते. सकाळच्या वेळेत, खास करून रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाण्याने त्रास होणार नाही ते पाहूया.

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

रिकाम्यापोटी हे पदार्थ खाणे त्रासदायक ठरणार नाही

१. दलिया

तुम्हाला कामावर किंवा इतर कुठे बाहेर जाण्यासाठी उशीर झाला असेल आणि सकाळपासून तुम्ही काहीही खाल्ले किंवा प्यायले नसल्यास, नाश्ता म्हणून दलिया खाणे उत्तम ठरेल. दलियामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. सकाळी हा पदार्थ खाण्याने, दुपारपर्यंत भूक लागत नाही, त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठीसुद्धा दलिया फायदेशीर ठरू शकतो. एवढेच नाही तर दलिया पचनामध्येही मदत करतो.

हेही वाचा : अपचनाचा त्रास होणार नाही; जेवणानंतर फक्त ‘हे’ योगासन करा, पाहा फायदे…

२. कोमट पाणी

सगळ्यांनाच माहीत आहे की, रिकाम्यापोटी कोमट पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते. परंतु, या कोमट पाण्यात जर तुम्ही थोडासा मध घातलात तर त्यामधून शरीराला जीवनसत्वे, खनिजे यांसारख्या पोषक घटकांचा पुरवठा होऊन हे एक डिटॉक्स [Detox] पेय म्हणूनदेखील काम करते. असे डिटॉक्स पेय पिण्याने तुमच्या शरीरातील नको असलेले घटक शरीराबाहेर काढण्यासाठी मदत करतात. “रिकाम्यापोटी कोमट पाणी पिणे म्हणजे तुमच्या पोटाच्या यंत्रणेला हळूवार जागे करण्यासारखे आहे. अशा कोमट पाण्यात जर तुम्ही थोड्या प्रमाणात मध मिसळून प्यायलात, तर शरीराला जीवनसत्वे, खनिजे यांसारखे पोषक घटक मिळतील आणि शरीरातील अनावश्यक आणि विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होईल”, असे आहारतज्ज्ञ डॉक्टर एमिली टर्नर यांचे म्हणणे आहे, अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखातून समजते.

३. अंडी

अंडी खाल्ल्याने आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी मुबलक ऊर्जा मिळते. यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज जीवनसत्वे तर असतातच, सोबत प्रथिनेसुद्धा प्रचंड प्रमाणात असतात. यामध्ये असणाऱ्या अमिनो आम्ल आणि चांगल्या फॅट्समुळे तुमच्या दिवसाची सुरुवात या पदार्थासोबत करणे उत्तम ठरते. “सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश करणे फार उपयुक्त असते. यामध्ये प्रचंड प्रमाणात असणाऱ्या खनिजांमुळे, जीवनसत्वांमुळे आणि अर्थातच प्रथिनांमुळे तुमच्या दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने होण्यास मदत होते”, असे आहारतज्ज्ञ मीरा शर्मा यांचे म्हणणे आहे.

४. पपई

पपई हे फळदेखील सकाळी रिकाम्या पोटी खाणे फायदेशीर ठरू शकते. हे फळ आतड्यांसाठी उत्तम असून, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. कॅलरीजचे कमी प्रमाण आणि पोटासाठी फायदेशीर असणाऱ्या पपईचा वापर तुम्ही वजन कमी करण्यासाठीसुद्धा करू शकता. “पपईमध्ये असणाऱ्या एन्झाईम [enzyme] या घटकामुळे, पचन चांगले होण्यास मदत होते. त्यासोबतच यात चांगले फॅट्स आणि कमी कॅलरीज असल्याने वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व पोटाच्या उत्तम आरोग्यासाठी हे फळ उपयुक्त आहे”, असे आहारतज्ज्ञ डॉक्टर विक्रम मल्होत्रा यांचे म्हणणे आहे.

५. सुकामेवा

सकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम, अक्रोड, शेंगदाणे खाल्ल्याने या सर्वांमधून तुम्हाला प्रथिने, चांगले फॅट्स, फायबर मिळण्यास मदत होते. त्यासोबतच दिवसभर काम करण्यासाठी भरपूर प्रमाणात ऊर्जादेखील या भिजवलेल्या सुक्यामेव्यामधून प्राप्त होते. “अक्रोड, बदाम आणि शेंगदाणे हे भिजवून खाल्ल्याने तुमच्या शरीराला यामधून मुबलक प्रमाणात फायबर, फॅट्स आणि प्रथिनांसारखे पौष्टिक घटक मिळण्यास मदत होते. या तीन पदार्थांमधून तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जेचा पुरवठादेखील होतो”, असे स्टेट्स अधिकृत आहारतज्ज्ञ लिसा थॉमसन [states Registered Dietitian, Lisa Thompson] यांचे मत आहे.

हेही वाचा : फ्रिजमध्ये बटरची पाकिटे उघडी ठेवू नका; हा पदार्थ योग्य प्रकारे साठवण्यासाठी शेफने सांगितलेली ‘ही’ हॅक वापरा.

प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, तसेच प्रत्येकाचा आहारही वेगळा असतो. कुणाला कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात आणि कोणत्या नाही, हेदेखील व्यक्तिनुरूप बदलत असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी कोणताही पदार्थ रिकाम्यापोटी खाणे सुरू करण्यापूर्वी एखाद्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच आपला आहार ठरवावा किंवा आहारात बदल करावा.

Story img Loader