White Clothes Cleaning Hack: पांढऱ्या रंगाचे कपडे अनेक जण आवर्जून घालत असले तरीही त्या कपड्यांवरील डागांमुळे अनेक जण वैतागतात. काही केल्या पांढऱ्या कपड्यांवरचे डाग जाता जात नाहीत. अशा वेळी तुम्ही काही उपाय नक्कीच ट्राय करू शकता, ज्यांच्या मदतीने तुम्ही पांढरे कपडे नव्यासारखे स्वच्छ करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांढरे कपडे स्वच्छ करण्याचे मार्ग

बऱ्याचदा पांढऱ्या कापडावरील डाग साफ करताना लोक ते इतके जोरात घासतात की, कापड फाटते. तुम्हीही अशा लोकांपैकी एक आहात का, जे डाग पडण्याच्या भीतीने पांढरे कपडे घालण्यास घाबरतात? तुमच्यासाठी या लेखात आम्ही तुम्हाला पांढरे कपडे स्वच्छ करण्याचे काही उत्तम मार्ग सांगू, ज्यांच्या मदतीने तुम्ही ते सहजपणे स्वच्छ करू शकता. ते मार्ग खालीलप्रमाणे :

लिंबू आणि मिठाचा वापर

तुम्ही लिंबू आणि मीठ वापरून पांढऱ्या कपडे सहजपणे स्वच्छ करू शकता. त्यासाठी डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा आणि तिथे मीठ टाका. मग सुमारे १० ते १५ मिनिटे उन्हात ठेवा. आता ते साध्या पाण्याने धुवा. अशा प्रकारे सर्वांत हट्टी डागदेखील सहजपणे काढले जातील.

टूथपेस्टचा उपयोग

पांढऱ्या कपड्यांवरील हट्टी डाग पांढरी टूथपेस्ट सहजपणे काढून टाकू शकते. त्यासाठी डाग असलेल्या भागांवर पांढरी टूथपेस्ट लावा. आता काही काळ ती टूथपेस्ट तशीच राहू द्या. सुमारे पाच मिनिटांनंतर तुम्ही तो डाग असलेला भाग चांगल्या पाण्याने धुऊ शकता. दरम्यानच्या काळात तुम्ही त्या डागावर ब्रशने हलके घासू शकता.

हायड्रोजन पॅरोक्साइड आणि डिश साबणाचे द्रावण

तुम्ही हायड्रोजन पॅरोक्साइड आणि डिश साबणाच्या मदतीने तुम्ही डाग सहज घालवू शकता. त्यासाठी प्रथम हायड्रोजन पॅरोक्साइड आणि डिश साबण समान प्रमाणात मिसळा. आता ते द्रावण डागावर लावा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. आता ब्रशच्या मदतीने डागावर हलकेसे घासून कपडा स्वच्छ करा.