Friendship Day 2022 in India : मैत्रीचा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणार्या काही व्यक्ती म्हणजे आपले मित्र! खरं तर ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस ७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसह खास वेळ घालवून सेलिब्रेशन करतात.
मैत्रीचं नातं खूपच खास असतं. असं खास नातं जपणं महत्त्वाचं आहे. फ्रेंडशिप डे मित्रांना समर्पित आहे. या दिवशी लोक त्यांच्या मित्रांना आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्व सांगतात. तुम्हीही या खास प्रसंगी हे मैत्रीपूर्ण संदेश आपल्या जवळच्या मित्रांबरोबर शेअर करा.
तुझ्यावर कोणी इतकं प्रेम केलं असेल तर सांग…
कोणाला तुझा इतका अभिमान वाटत असेल तर सांग…
तुझ्याशी सगळेच मैत्री करतील,
पण माझ्यासारखी कोणी मैत्री निभावेल का, ते सांग.
सर्व मित्र सारखे नसतात…
काही आपले असूनही आपले नसतात…
तुमच्याशी मैत्री केल्यानंतर वाटले,
कोण म्हणतं तारे जमिनीवर नसतात.
आयुष्य प्रत्येक पावलावर परीक्षा घेते
आयुष्य प्रत्येक दिवशी नवीन धक्का देते
पण आयुष्याकडे तक्रार तरी कशी करावी,
शेवटी तुझ्यासारखा मित्र या आयुष्यातूनच मिळाला.
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की तुझ्यासारखा मित्र मला मिळाला जो माझ्यासाठी मित्रापेक्षा खूप जास्त आहे, जो माझे जीवन आहे. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण कितीही मोठे झालो, आपल्यात कितीही अंतर असले तरीही तू कायमच माझ्या हृदयात राहशील. तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
तू, देवाने मला दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहेस. आपण आयुष्यभर चांगले मित्र राहावे अशी माझी इच्छा आहे. तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हा सर्वांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा. या मैत्री दिनानिमित्त तुम्हाला प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहे. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो.
या जगात असे कोणतेही अंतर नाही जे आपल्याला वेगळे करू शकेल, कारण आपण आपल्या हृदयाशी घट्ट जोडलेले आहोत आणि आपली मैत्री शाश्वत आहे. या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने, मी वचन देते की मी माझ्या आयुष्यातील या सर्वोत्तम नात्यासाठी सदैव कृतज्ञ राहीन. खूप खूप प्रेम!
Friendship Day 2022 : यावर्षी आपल्या प्रिय मित्राला द्या ‘या’ खास भेटवस्तू
तू माझ्या आयुष्यात आलास, तू माझे मन जिंकलेस, आणि तू राहिलास… ही आमच्या मैत्रीची छोटी आणि गोड कथा आहे जी सर्वांत सुंदर आहे. मला नेहमी साथ दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा, माझ्या मित्रा! तू अशी व्यक्ती आहेस ज्यावर मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वास ठेवू शकतो. आपली ही सुंदर मैत्री कायम राहो!
आपली सतत काळजी करणारे लोक आसपास असणे किती चांगले असते. माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती बनून राहिल्याबद्दल तुझे धन्यवाद. फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा.
तू माझ्या हास्याची चमक आहेस, अंधारातला प्रकाश आहेस, मी हरवल्यावर तूच आशा आहेस. मित्रा तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
काही लोक येतात आणि तुमच्या जीवनावर इतका सुंदर प्रभाव पाडतात की त्यांच्याशिवाय आपले आयुष्य कसे होते हे आपल्याला आठवतच नाही.