How To Make Paneer from rice: भारतातील अनेक लग्न समारंभ, सण-वाराला पनीरपासून बनविले जाणारे अनेक पदार्थ बनवले जातात. पनीर मसाला, पनीर टिक्की, पनीर चिल्ली असे एकापेक्षा एक विविध पदार्थांची मेजवानी लोकांना ट्राय करायला आवडते. परंतु, दुधापासून बनवलेलं हे पनीर सातत्यानं खाणं आरोग्यासाठी घातकही ठरू शकतं. अशा वेळी दुधाचा वापर न करता, आणखी एका पदार्थापासून तुम्ही पनीर बनवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुधाचा वापर न करता बनवा पनीर

दुधाचा वापर न करता, तुम्ही भातापासूनही पनीर बनवू शकता. हे पनीर आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्यात अनेक आवश्यक पोषक घटकदेखील आढळतात. पनीर खायला खूप चविष्ट आहे आणि ते अगदी सहज बनवता येतं. तसे, बहुतेक लोक बाजारातून दुधापासून बनवलेलं चीज खरेदी करतात आणि भाजी बनवतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही तांदूळ वापरूनही सहजपणे पनीर बनवू शकता.

तांदळापासून असे बनवा पनीर

साहित्य

  • २ कप तांदूळ
  • ५ कप पाणी
  • १ लिंबू
  • सुती कापड

तांदळापासून पनीर कसे बनवायचे?

तांदळापासून पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम रात्री तांदूळ पाण्यात भिजवा. रात्री भिजवलेले हे तांदूळ सकाळी मिक्सरमध्ये पाण्यासोबत बारीक करा आणि ते गाळून दूध काढा. आता हे तांदळाचं दूध मंद आचेवर गरम करा. ते दूध उकळू लागलं की, त्यात हळूहळू लिंबाचा रस घाला आणि ढवळत राहा. काही वेळानं त्या दुधाचं दही होईल आणि चीजसारखं दिसू लागेल. आता ते कापडानं गाळून, त्यावर वजन ठेवा आणि दोन ते तीन तास तसेच राहू द्या. अशा प्रकारे काही वेळानं दुधाच्या पनीरसारखं पनीर तयार होईल. आता तुम्ही या पनीरद्वारे तुमची आवडती रेसिपी बनवू शकता.

तांदळापासून बनवलेल्या पनीरचे फायदे

तांदळापासून बनवलेलं पनीर १००% व्हेगन आणि लॅक्टोजमुक्त आहे. खाल्ल्यानंतर ते सहज पचतं. त्यात प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं.