How To Maintain Healthy Bone: निरोगी आयुष्यासाठी हाडे निरोगी राहणे आवश्यक आहे. हाडे स्ट्रक्चरल फ्रेम तयार करतात आणि म्हणूनच शरीराच्या सुरळीत कार्यासाठी त्यांना मजबूत ठेवणे आवश्यक आहे. शहरी जीवनाच्या या व्यस्त दिनचर्येमध्ये, लोकांना हाडांच्या वेदना होतात. याचे कारण म्हणजे आजकाल लोकांची विस्कळित, अस्वास्थ्यकर जीवनशैली. जीवनशैलीत काही छोटे बदल करणे आवश्यक आहे जे आपल्या शरीरावर मोठा प्रभाव टाकू शकतात आणि हाडांशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करतात.

निरोगी हाडांची देखभाल कशी करावी

१. पौष्टिक आहार: मजबूत हाडांसाठी संतुलित, पौष्टिक आहार आवश्यक आहे. मजबूत आणि निरोगी हाडांठी कॅल्शियम आणि विटामिन डी आवश्यक आहेत. हे डेअरी प्रोडक्ट्स, सी फूड आणि हिरव्या भाज्या उपलब्ध आहेत. व्हिटॅमिन डी सूर्य किरणांमध्ये सहजतेने प्राप्त केली जाऊ शकते. या पोषक तत्वांची कमतरता असलेल्या आहारामुळे हाडांची घनता कमी होते आणि त्यामुळे वेदना आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…
Which is the best time to exercise
तुम्हालाही व्यायामाची आवड आहे? मग, थांबा… कधीही व्यायाम केल्याने उदभवू शकतात गंभीर समस्या
food and drug interactions
Food And Drug Interactions : औषधे घेण्यापूर्वी किंवा औषधे घेतल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत? वाचा, आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ माहिती…
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
Rajiv Kapoor alcohol addiction heart disease cardiovascular health
अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात

२. शारीरिक हालचाल करणे:
जेव्हा आपण शारीरिक हालचालीं करतो तेव्हा, वजन उचलण्याचे व्यायाम करतो त्यामुळे हाडे मजबूत होतात. हे आपल्या हाडांची घनता वाढवते आणि हाडांना आधार देणारे मजबूत स्नायू तयार करतात. चालणे, धावणे आणि वजन प्रशिक्षण यांसारख्या शारीरिक हालचाली खूप फायदेशीर ठरू शकतात.

३. दारू आणि धूम्रपानाच्या सवयी कमी करा:
मद्यपान आणि धुम्रपानाचा अतिरेक हाडांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. मादक पदार्थांच्या दुरुपयोगामुळे शरीराची कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे वापरण्याची क्षमता कमी होते जे मजबूत हाडे तयार करण्यास मदत करतात. धूम्रपानामुळे शरीर कमकुवत होते, ज्यामुळे शारीरिक हालचाली करणे कठीण होते. मजबूत आणि निरोगी हाडांसाठी धूम्रपान सोडणे आणि अल्कोहोलचे सेवन कमी करण्याची शिफारस केली जाते.

हेही वाचा – दररोज किती पावले चालल्यास मृत्यूचा होतो धोका कमी? वाचा संशोधन काय सांगते

४. निरोगी वजन राखणे:
हाडे निरोगी ठेवण्यासाठी शरीराचे वजनही निरोगी असणे आवश्यक आहे. जास्त वजन आणि कमी वजन दोन्हीमुळे हाडांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीराच्या कमी वजनामुळे हाडांची घनता कमी होते आणि जास्त वजनामुळे हाडांची गुणवत्ता खराब होते.

५. नियमित आरोग्य तपासणी करा:
कमकुवत हाडांच्या निदानासाठी हाडांची घनता स्कॅन आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मोजमाप यांसारखी नियमित हाडांची तपासणी आवश्यक आहे. चेकअपमुळे शरीराला जुनाट समस्यांपासून संरक्षण मिळते आणि हाडांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

हेही वाचा – Frizzy Hair Tips: झोपेतून उठल्यानंतर केस कोरडे- विस्कटलेले असतात का? आजच बदला ‘ही’ सवय, केसांना येईल चमक

म्हणूनच हाडांच्या निरोगी जीवनशैलीसाठी मोठे बदल आवश्यक नाहीत. लहान आणि सातत्यपूर्ण जीवनशैलीत बदल केल्याने हाडांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. हाडे शरीराचा आधार बनतात आणि म्हणूनच हाडांचे आरोग्य राखण्याकडे दुर्लक्ष केल्यास आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात गंभीर परिणाम होऊ शकतात.

Story img Loader