आपले केस लांब, घनदाट आणि चमकदार असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, अयोग्य आहारामुळे म्हणा, केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे किंवा सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या त्रासाने केस गळण्याच्या समस्येचा सामना बहुतेकांना करावा लागत आहे. यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारची तेलं, हेअर मास्कसारखी उत्पादने उपलब्ध असतात. परंतु, अशी उत्पादने सगळ्यांना परवडण्यासारखी असतीलच असे नाही. अशावेळी जर घरात असणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारे आणि कोणतेही रासायनिक घटक नसणारे तेल बनवता आले तर केसांच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरू शकते. नाही का?

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @samasya_and_samadhan या अकाउंटने कोरफडीच्या तेलाच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दाखवलेले सर्व पदार्थ आपल्या घरात आधीपासूनच असतात; त्यामुळे या तेलाची रेसिपी काय आहे ते पाहा.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

केसांसाठी कोरफडीचे घरगुती तेल कसे बनवावे पाहा

साहित्य

कांदा
कढीपत्ता
कोरफड
काळी मिरी
मेथीचे दाणे
खोबरेल तेल

हेही वाचा : केवळ ‘१० रुपयांमध्ये’ घालवा पायाचा काळपटपणा! या ‘दोन’ गोष्टी वापरून घरीच करा पार्लरसारखे पेडिक्युअर

कृती

सर्वप्रथम कोरफडीची पाने व्यवस्थित धुवून पानाच्या बाजूला असणारे काटे काढून, कोरफडीचे छोटे छोटे तुकडे करून बाऊलमध्ये ठेवावे. त्यानंतर त्याच बाऊलमध्ये कांद्याचे तुकडे आणि कढीपत्त्याची पाने घालावी.
हे सर्व पदार्थ मिक्सरमधूून वाटून घ्यावे.
आता गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये खोबरेल तेल घालून तयार केलेले कोरफड, कांदा आणि कढीपत्त्याचे मिश्रण घालून घ्यावे. हे सर्व मिश्रण सतत ढवळत राहून शिजवून घ्यावे. आता या मिश्रणाला बुडबुडे येऊ लागले की त्यामध्ये काळी मिरी आणि मेथीचे दाणे घालावे.
काही मिनिटांसाठी मंद गॅसवर हे तेल ढवळत राहून नंतर कढईखालील गॅस बंद करावा.
आता काचेच्या बरणीवर एक कापड ठेवून, त्यामधून हे तेल गाळून घेऊन बरणीत भरून घ्यावे.
केसांना घनदाट बनवणारे कोरफडीचे तेल तयार आहे.

तेल बनवून तर तयार आहे, परंतु याचा वापर कसा करायचा तेसुद्धा पाहा.

कोरफडीचे तेल कसे वापरावे?

आठवड्यातून तीन दिवस हे तेल आपल्या केसांच्या मुळांना लावून छान मसाज करावा. तेलाचा सांगितल्याप्रमाणे नियमित वापर केल्यास, तीन महिन्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आठवड्यातून तीन दिवस हे तेल केसांना लावल्यास केसांची गळती कमी होईल, केस तुटण्यासारखी समस्या कमी होऊन नवीन केस उगवण्यास मदत होऊ शकते.

इन्स्टाग्रामवरून @samasya_and_samadhan या अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओमधून ही रेसिपी दाखवली असून, यातील कोणत्याही पदार्थाचा तुम्हाला त्रास/ ॲलर्जी असल्यास याचा वापर करू नये, असा सल्लादेखील दिलेला आहे.