Makeup Hacks And Tips : लग्न, साखरपुडा, वाढदिवस किंवा ऑफिस पार्टी अशा अनेक कार्यक्रमांना महिलांना नटून थटून मेकअप करून जायला आवडते. यात मेकअपमुळे चेहऱ्याला एक वेगळा ग्लो, शाइन येते आणि तुम्ही चारचौघांत उठून दिसता. पण, या कार्यक्रमांतून घरी आल्यानंतर अनेकजणी आळसपणा किंवा थकल्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप काढण्यास कंटाळा करतात. जर तुम्हीही असे करत असाल तर ही सवय आत्ताच थांबवा, कारण यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते.

कारण चेहऱ्यावर जास्त वेळ मेकअप केल्याने तुमच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही मेकअप लावला तर त्वचेची काळजी घेण्यासाठी तो योग्य वेळी काढणे आवश्यक ठरते. यामुळे आम्ही तुम्हाला मेकअप किती वेळाने काढला पाहिजे, काढल्यानंतर त्वचेची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे याविषयी सांगणार आहोत.

मेकअप करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे?

१) त्वचेचा प्रकार

जर तुमची त्वचा खूप संवेदनशील किंवा एक्ने प्रोन असेल तर तुम्ही चेहऱ्यावर कमीत कमी वेळ मेकअप ठेवला पाहिजे.

२) प्रोडक्ट क्वॉलिटी

मेकअप केल्यानंतर त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तुम्ही मेकअपसाठी चांगल्या क्वॉलिटीच्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करा.

३) स्किन केअर

जर तुम्ही नियमितपणे मेकअप करत असाल तर अशा परिस्थितीत त्वचेची खूप काळजी घ्यावी. विशेषत: त्वचेला नियमितपणे मॉइश्चरायझ करायला विसरू नका.

चेहऱ्यावर मेकअप किती वेळ ठेवणे सुरक्षित?

चेहऱ्याच्या त्वचेची चांगली काळजी घेण्यासाठी सर्वात आधी चांगल्या मेकअप प्रोडक्टसचा वापर करा. चेहऱ्यावर एकदा मेकअप केल्यानंतर तो ८ ते १२ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. याचा अर्थ असा की, चेहऱ्यावर साधारणपणे ८-१२ तास मेकअप ठेवणे सुरक्षित असते.

यापेक्षा जास्त वेळ मेकअप ठेवल्यास तो चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये अडकतो, ज्यामुळे काळे डाग आणि मुरुमांची समस्या वाढते, चेहऱ्यावर एलर्जी, जळजळ यांसारख्या समस्या वाढू शकतात. तसेच चेहरा अधिक कोरडा, निस्तेज दिसू शकतो.

थंडीपासून वाचण्यासाठी पोलिसाचा अनोखा जुगाड; हातकडी बांधलेल्या कैद्याला दिली बाईक अन्…; Video व्हायरल

या व्यतिरिक्त काही अहवालांचे परिणाम असे दर्शवतात की, चेहऱ्यावर मेकअप जास्त वेळ राहिल्यास हायपरपिग्मेंटेशनची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर ८ ते १२ तासांपेक्षा जास्त मेकअप ठेवू नका.

Story img Loader