स्त्रीया त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या मेकअप प्रोडक्सचा वापर करतात. बऱ्याच स्त्रिया त्यांचे मेकअप प्रोडक्ट्स बाथरूम किंवा कपाटात ठेवतात. यामूळे हे मेकअप प्रोडक्ट्स खराब होण्याची जास्त शक्यता असते. पण मेकअप प्रोडक्ट्स कधीही गरम किंवा दमट ठिकाणी ठेवू नयेत. यामुळे तुमची महागडी प्रोडक्ट्स् खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमचे आवडते मेकअप प्रोडक्ट्स जास्तित जास्त दिवस चांगल्या कशा ठेवता येतील आणि तुमच्या त्वचेला त्रास न होता उलट त्वचेला लाभ होईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होतं काय की, अनेकदा आपण मेकअप प्रोडक्ट्स व्यवस्थित योग्य जागी ठेवत नाही. त्या गोष्टी एक एक करून खराब होण्यास सुरूवात होते. खराब प्रोडक्ट्स वापरल्यानं अनेकदा त्वचेवरही परिणाम होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मग काय करता येईल?

फ्रिजमध्ये मेकअप प्रोडक्ट्स ठेवा
तुमच्या आवडत्या आणि दररोज लागणाऱ्या मेकअप प्रोडक्ट्सची काळजी घेण्यासाठी तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. सर्व प्रोडक्ट्स फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही, फक्त काही प्रोडक्ट्स फ्रीजमध्ये ठेवली जातात. बाथरूममध्ये नेहमी ओलावा असतो. म्हणूनच त्वचेवर लावण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये जिवाणू वाढू शकतात. आणखी एक कारण म्हणजे गरम शॉवर घेतल्यानंतर तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने ऑक्सिडाइझ होऊ शकतात आणि उष्णतेमुळे ते खराब होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने जसे की सीरम, नाईट क्रीम, फेस मास्क आणि डोळ्याच्या क्रीम आपल्या फ्रिजमध्ये नेहमी ठेवाव्यात. या व्यतिरिक्त, इतर त्वचेची काळजी घेणारी उत्पादने जसे मॉइस्चरायझर्स, लोशन आणि ओठ बाम बंद केबिनमध्ये ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.

हे मेकअप प्रोडक्स्ट ठेवा फ्रिजमध्ये
लिपस्टिक- लिपस्टिक दीर्घकाळ चांगली ठेवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्याने लिपस्टिक खराब होत नाही.

एलोव्हेरा जेल- एलोव्हेरा जेल खोलीच्या तापमानात ठेवल्यास ते खराब होऊ शकते. म्हणून ते फ्रेश ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

हे मेकअप प्रोडक्ट्स फ्रिजमध्ये ठेवू नका:

लाइनर- लाइनर कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण ते पटकन कोरडे होईल. लाइनर आणि मस्करा हे प्रोडक्ट्स खोलीच्या तपमानावर ठेवावेत.

नेलपेंट- फ्रिजमध्ये नेल पॉलिश ठेवल्यामुळे ती सुकते आणि पटकन खराब होते. बराच काळ नेल पॉलिश चांगली टिकवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवू नका.

(टीप: लेखात दिलेला सल्ला फक्त सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makeup products caring tips store these beauty product in the fridge not in the bathroom prp