Viral Video : गजरा हा फुलापासून बनलेला पारंपारिक भारतीय दागिना आहे. गजऱ्यामध्ये वेगवेगळ्या फुलांचा समावेश केला जातो. भारतीय लूक आणि त्यावर गजरा, हे सुंदर जोड अनेकदा पाहायला मिळते. अनेक महिलांना गजरा माळायला आवडतात पण परफेक्ट आणि सुंदरपणे गजरा कसा माळायचा, हे माहिती नसते. तुम्हाला पण गजरा कसा माळायचा, हे माहिती नाही तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परफेक्ट गजरा कसा माळायचा, त्याविषयी सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Makeup Tip how to wear perfect gajra on hairs perfect gajra hairstyle video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला एका दुसऱ्या महिलेच्या केसामध्ये गजरा माळताना दिसत आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळताना दिसत आहे. अतिशय सुंदरपणे आणि पद्धतशीरपणे ही महिला केसामध्ये गजरा माळताना दिसत आहे. गजरा माळल्यानंतर महिलेचा लूक अप्रतिम दिसत आहे. हा व्हिडीओ तुमच्या उपयोगात पडू शकतो. लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी तुम्हाला केसामध्ये अशाप्रकारे गजरा माळता येईल.नऊवारी, साडी किंवा कोणत्याही पारंपारिक वेशभूषेत तुम्ही गजऱ्याचा हा लूक करू शकता.

हेही वाचा : महिलेने बँकेत पैसे जमा करताना रकमेएवजी डिपॉझिट स्लिपवर लिहिले असे काही की… बँक कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का; पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक करा

paramparikbyjidnyasa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साडीवर गजरा हवाच तो कसा माळायचा पहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. १७ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

हेही वाचा : Pune : भारताच्या विजयानंतर पुण्यात चालत्या PMT बसवर उभे राहून तरुणांनी केला डान्स, FC रोडवरील Video Viral

सोशल मीडियावर ब्युटी टिप्स सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी टिप्स सांगतात तर कधी कोणी केसांसाठी सुंदर हेअर स्टाइल सांगतात. युजर्स अशा व्हिडीओला अधिक पसंती देतात. काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये ज्या लोकांना मेकअप करता येत नाही त्यांच्यासाठी भन्नाट १० टिप्स सांगितल्या होत्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makeup tip how to wear perfect gajra on hairs perfect gajra hairstyle video goes viral ndj
Show comments