Malaika Arora Facial Yoga Tips : बॉलिवूडमधील सुंदर आणि सर्वात फिट अभिनेत्री मलायका अरोराच्या सौंदर्याविषयी नेहमीच चर्चा रंगताना दिसते. कमालीचा फिटनेस आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. २५ वर्षाच्या तरुणीला लाजवले असे तिचे सौंदर्य आहे, वयाच्या ५० व्या वर्षी देखील फिटनेसमुळे ही अभिनेत्री अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. अनेकांना या अभिनेत्रीला पाहून मनात एकच प्रश्न येतो की, वयाच्या पन्नाशीतही तिच्या चेहऱ्यावर अशी चमक कशी काय टिकून आहे? याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊ…

काय आहे मलायका अरोराच्या सौंदर्याचे रहस्य?

काही दिवसांपूर्वी या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्रीने स्वतःच एक व्हिडिओ शेअर दिले होते. या व्हिडिओमध्ये मलायका फेशियल योगा करताना दिसत होती. यावेळी तिने काही अतिशय सोपी योगासने करुन दाखवली होती, ज्याने तुमची चेहऱ्याची त्वचा चमकदार बनवू शकता, तसेच त्वचेवर अँडी एजिंग प्रभाव आणू शकता. मलायच्या व्हिडीओतील हीच योगासने डिजिटल क्रिएटर आणि इन्फ्यूएंसर अंजनी भोज हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटमधील व्हिडीओमध्ये सोप्या पद्धतीने करुन दाखवली आहेत.

बलून पोझ

सर्व प्रथम बलून पोझ बद्दल जाणून घेऊयात. व्हिडिओमध्ये पाहू शकता, ही पोझ करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तोंडात हवा भरुन फुगवायचे आहे. यानंतर, काही सेकंदांसाठी श्वास रोखून ठेवायचा. या दरम्यान तुमची इच्छा असल्यास तुम्ही ओठांवर बोट ठेवून तोंडातून हवा बाहेर येण्यापासून रोखू शकता. यानंतर हळूहळू श्वास सोडायचा आहे. बलून पोझमुळे चेहऱ्याच्या स्नायूंना आराम देऊन रक्ताभिसरणात मदत होते. याशिवाय, सैल त्वचा घट्ट होण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करते.

फेस टॅपिंग

फेस टॅपिंग करण्यासाठी, सर्वप्रथम तुमचा चेहरा थोडा वर उचला. यानंतर बोटांच्या मदतीने कपाळापासून संपूर्ण चेहऱ्यावर हलके टॅप करा. अशा प्रकारे हलक्या हातांनी चेहऱ्यावर ४ ते ५ वेळा टॅप करत रहा. फेस टॅपिंगमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायचीय? मग आठवड्यातून किमान १५० मिनिटे करा ‘हे’ व्यायाम प्रकार

फिश पोज

फिश पोज करण्यासाठी, सर्वप्रथम मान थोडी वर करा, यानंतर आपले गाल आतील बाजूस खेचून आपल्या ओठांचा पाऊट करा. २० ते २५ सेकंद याच स्थितीत राहा. ही पद्धत तुमच्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. या आसनामुळे चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास आणि जॉ लाइन परफेक्ट दिसण्यास मदत होते. याशिवाय, या आसनामुळे चेहऱ्यावरील त्वचाही घट्ट होते. अशाप्रकारे, या सोप्या योगासनांच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ चमकदार आणि तरुण ठेवू शकता.