डच संशोधकांचे संशोधन
मलेरियावर वापरले जाणारे प्रथिनाचे रेणू हे कर्करोगाच्या उपचारातही प्रभावी ठरतात, असे दिसून आले आहे. हा शोध अनपेक्षितपणे लागला असून कर्करोगावरील उपचारात त्यामुळे फरक पडणार आहे. डॅनिश संशोधकांनी एका गर्भवती महिलेला मलेरियापासून वाचवण्यासाठी औषधांचा वापर केला असता ही बाब लक्षात आली. कारण यात नाळेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
मलेरियावर दिलेल्या औषधाचे प्रथिन रेणू हे कर्करोगावरही हल्ला करू शकतात असे यात स्पष्ट झाले, यात कर्करोग उपचारात एक नवी दिशा मिळाली आहे.
वैज्ञानिकांनी मलेरिया लशीत वापरले जाणारे प्रथिन व कर्करोगाविरोधात वापरले जाणारे विषारी द्रव्य यांचे मिश्रण तयार करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. यात कर्करोगावर अधिक प्रभावीपणे उपचार करणे शक्य आहे. कर्करोगावरील ही नवीन उपचार पद्धती हजारो लोकांचे प्राण वाचवू शकणार आहे. वैज्ञानिकांना असे दिसून आले की, मलेरियाविरोधी प्रथिने व कर्करोगविरोधी द्रव्याची प्रथिने एकाच काबरेहायड्रेटला चिकटतात. काबरेहायड्रेटमुळे नाळ अधिक वेगाने वाढते, पण या नवीन संशोधनामागील संशोधकांना असे दिसून आले की, मलेरियाचा परोपजीवी जंतू व कर्करोगाच्या गाठींवर त्याचा प्रभावी परिणाम होतो. कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात.
वैज्ञानिकांच्या मते नाळ व गाठ यांच्यात काही साम्य असते, त्याचा वापर वैद्यकीय उपचारांसाठी करण्याचा वैज्ञानिकांचा एक विचार होता, तो यात यशस्वी झाला आहे.
अनेक दशके हे साम्य आम्ही शोधत होतो असे कोपनहेगन विद्यापीठाचे अली सलांती यांनी सांगितले.
नाळ हा असा अवयव आहे ज्यात पहिले काही महिने काही पेशी हळूहळू वाढतात व त्यांचे वजन दोन पौंड असते व त्यातून गर्भाला ऑक्सिजन व पोषण मिळते. कर्करोगाच्या गाठींमध्येही याच पद्धतीने काम चालते व त्या प्रतिकूल स्थितीत आक्रमकपणे वाढत असतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader