Mangal Rashi Parivartan January 2022 : ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. नवीन वर्ष २०२२ मध्ये अनेक ग्रहांच्या हालचाली बदलणार आहेत. ग्रहांचा सेनापती आणि भूमी पुत्र मंगळ देखील जानेवारी २०२२ मध्ये राशी बदलणार आहे. मंगळाचे हे राशी परिवर्तन १६ जानेवारी २०२२ रोजी होईल आणि या काळात मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीत मंगळाच्या आगमनाने अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि आर्थिक लाभही होतील. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ४ राशी, ज्यासाठी मंगळाचा राशी बदल शुभ होणार आहे.

Mangal Margi 2025
१८ दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळच्या सरळ चालीमुळे धनाने भरेल झोळी; तुमची रास आहे का नशीबवान?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
February 2025 Grah Gochar
फेब्रुवारीमध्ये सुर्यासह ४ ग्रह करणार गोचर! ‘या’ ५ राशीच्या लोकांना मिळणार राजयोगासारखे सुख, चहुबाजुंनी मिळणार यश

मेष: या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी परिवर्तन शुभ सिद्ध होईल. मंगळ गोचराच्या प्रभावाने धन, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तसंच गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. याशिवाय या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे परिवर्तन शुभ राहील. मेष राशीवर मंगळ ग्रहाचं राज्य असतं. त्यामुळे या राशीच्या लोकांना मंगळाचा पूर्ण आशीर्वाद मिळणार आहे. या दरम्यान तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल आणि तुम्ही व्यवसायातही पैसे कमवू शकाल.

आणखी वाचा : Happy New Year 2022 Wishes In Marathi : नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतील खास Whatsapp Messages, Quotes, SMS, Status

मिथुन: २०२२ मध्ये मंगळाचे पहिले राशी परिवर्तन लाभाच्या दृष्टीकोनातून शुभ राहील. १६ जानेवारीला मंगळ धनु राशीत प्रवेश करताच धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश आणि प्रसिद्धी मिळेल. मंगळ राशी परिवर्तनाच्या काळात उत्पन्न वाढेल. याशिवाय वैवाहिक जीवन आनंदी राहील. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

आणखी वाचा : New Year 2022 : नवीन वर्षात या चार सवयी सोडा, जोडीदारासोबतचं नातं सुखी होईल!

कन्या : मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यवसाय आणि नोकरीमध्ये पूर्वीपेक्षा चांगल्या संधी मिळतील. मंगळाच्या शुभ प्रभावाने वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. कुटुंबात भावंडांचे सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. या दरम्यान तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात यश मिळेल.

मीन: मंगळाच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. या काळात तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. जीवनात सुरू असलेल्या आर्थिक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. याशिवाय शत्रू आणि विरोधक पराभूत होतील. मंगळ संक्रमणादरम्यान नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कठोर परिश्रमाने कराल त्या प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. याशिवाय पालकांचे सहकार्य मिळेल. तसेच आत्मविश्वासही मजबूत असेल.

Story img Loader