Health Benefit Of Mango Seeds : उन्हाळ्याचा सीझन सुरु झाला असून अनेकांच्या घरी आता आंबे खाल्ले जात असतील. यामुळे बाजारपेठेतही आंब्याचे अनेक प्रकार आता मिळत आहे. या आंब्यांपासून काही लोक रस बनवतात, काहीजण मँग्नो मिल्क शेक तर काहींना तो असाच कापून खायला आवडतो. पण आंब्या पूर्णपणे खाऊन झाला की त्यातील कोय आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का, आंबा तर फायद्याचा आहेच पण आंब्याची साल आणि कोय देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे आज पण आंब्याच्या आतील कोयचे किती फायदे आहेत ते सांगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंब्याच्या कोयचे आरोग्यदायी फायदे

१) अतिसार

आंब्याची कोय अर्थात आतील बीचे चूर्ण दिवसातून तीन वेळा घेतल्यास जुलाब किंवा आमांश बरा होतो. आंब्याच्या बिया वाळवून बारीक करा, आता त्यात १-२ ग्रॅम मध टाकून त्याचे सेवन करा.

२) लठ्ठपणा

आंब्याच्या बियांमुळे लठ्ठ लोकांना त्यांचे अतिरिक्त वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते, तसेच कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत होते.

३) कोलेस्टेरॉल

आंब्याची कोय रक्ताभिसरण क्षमता वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते, हे रक्तातील साखर आणि सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन पातळी कमी करण्यास अप्रत्यक्षपणे मदत करतात.

४) मॉइश्चरायझर

मँगो सीड बटर हे कोरड्या त्वचेसाठी एक वरदान मानले जाते, कोरड्या त्वचेसाठी हे एक सर्वोत्तम लोशन आहे. विशेषत: डोळे आणि घसा यांसारख्या नाजूक भागांसाठी हे चांगले असते.

५) ओठ कोरडे होणे

कोरड्या ओठांना हायड्रेट आणि मऊ करण्यासाठी १०० टक्के नॅचरल लिप बाम म्हणून आंब्याच्या बियांचे बटर वापरले जाऊ शकते. झोपण्यापूर्वी कोरड्या ओठांवर हे लिप बाम लावा, हे त्वचेच्या पेशींना मॉइश्चयरायझ करते आणि मृत पेशांना कमी करण्यास मदत करते.

६) पुरळ

आंब्याच्या बियांपासून एक स्क्रब तयार केले जाऊ शकते, जे तुम्हाला मुरुमांपासून लढण्यास मदत करेल. आंब्याच्या कोयची बारीक पावडर करुन ती टोमॅटोमध्ये मिक्स करा, नंतर ती चेहऱ्यावर नीट लावा. हे स्क्रब त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी ब्लॅकहेड्स, ब्रेकआउट्स, मुरुम आणि डाग बरे करण्यासाठी तसेच त्वचेवरील छिद्र आणि लालसरपणा कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

७) हृदयरोग

आंब्याची कोय हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. मज्जासंस्था ही हृदय आणि रक्तवाहिन्यांशी जोडलेली असते. त्यामुळे रोजच्या आहारात आंब्याच्या कोयचे थोडेसे सेवन हृदयविकार आणि उच्च रक्तदाब दूर ठेवू शकतात.

८) कोंडा

आंब्याची कोय तुम्हाला कोंडा दूर करण्यास मदत करतात. आंब्याच्या कोयचे लोणी हे केसांना चमकदार आणि मजबूत ठेवतात. तुम्ही आंब्याच्या कोयचे चूर्ण मोहरीच्या तेलातही मिसळून काही दिवस उन्हात ठेवू शकता. हे मिश्रण लावल्याने टक्कल पडणे, केस गळणे, अकाली केस पांढरे होणे आणि कोंडा यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.

आंबा गोड आहे की आंबट कसा ओळखायचा? फक्त ‘या’ ३ ट्रिक्स लक्षात ठेऊन आंबा खरेदी करा

९) निरोगी दात

आंब्याच्या कोयपासून टूथ पावडर बनवता येते. आंब्याच्या कोयची पावडर हाताच्या तळव्यावर थोडीशी घ्या, टूथब्रश ओला करा, त्यात बुडवा आणि दात घासून घ्या. ही पावडर तुमचे दात निरोगी ठेवण्यास मदत करेल.

१०) निरोगी त्वचा

आंब्याच्या बियांचे तेल एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर आहे. त्वचेला पोषण आणि मॉइश्चरायझिंग करण्यासोबतच अनेक लोशनमध्येही याचा वापर केला जातो. हे मँगो बटर चेहऱ्यावर लावल्यास ते तेलकटपण आणि नॉन ग्रीसीपणा कमी होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango seed benefits mango kernels are very beneficial can provide relief from these 10 health problems sjr