Manmohan Singh Death Reason : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, २६ डिसेंबर रोजी रात्री ९.५१ वाजता निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. अचानक प्रकृती बिघडल्याने गुरुवारी त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. समोर आलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांना फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. पण, या श्वसनाच्या आजारामुळे गुरुवारी त्यांचे निधन झाले. डॉ. मनमोहन सिंग यांना नेमका कोणता आजार झाला होता? याची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊ..
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मनमोहन सिंग यांना वयोमानानुसार इतर काही आजार होते. त्यांना विस्मरणाचा त्रास होत होता, तसेच दीर्घकाळापासून ते रिस्पेरेटरी डिसीजने त्रस्त होते. रिस्पेरेटरी डिसीजला मराठीत श्वसनाचा आजार असे म्हटले जाते.
श्वसनाच्या आजारामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या आजारामुळे व्यक्तीच्या फुफ्फुस आणि श्वसनाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या समस्येची मुख्य कारणे म्हणजे वायूप्रदूषण, संसर्ग आणि धूम्रपान इ.
१९९० मध्ये झाली पहिली शस्त्रक्रिया
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर १९९० मध्ये पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. तज्ज्ञांच्या मते, हृदयात ब्लॉकेज आढळल्यानंतर बायपास सर्जरी करावी लागते. मनमोहन सिंग यांना त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याची माहिती मिळताच त्यांची पहिली बायपास शस्त्रक्रिया १९९० मध्ये झाली. त्यानंतर २००३ मध्ये मनमोहन सिंग यांची अँजिओप्लास्टी झाली.
श्वसन रोगाचे मुख्य कारण?
श्वास घेण्यात अडचण आल्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढतो. त्याचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसांवर होतो, त्यामुळे फुफ्फुसे नीट काम करू शकत नाहीत आणि हळूहळू फुफ्फुसे खराब होऊ लागतात. फुफ्फुसातील संसर्ग, धूम्रपान, वायूप्रदूषण अशा अनेक कारणांमुळे होऊ शकतो.
श्वसन रोग कोण कोणते?
फुफ्फुसाचा कर्करोग
दमा
टीबी
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी)
एम्फिसीमा
ब्राँकायटिस
पल्मोनरी फायब्रोसिस
सारकॉइडोसिस
हे आजार श्वसनासंबंधित आजार आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला श्वासोच्छ्वासाचा आजार असतो, तेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. विशेषत: हिवाळ्यात प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने या काळातच श्वसनाचे आजार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय खराब जीवनशैली, वेळी अवेळी खाणं आणि वातावरणामुळे श्वसनाच्या आजारांचा धोकाही झपाट्याने वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आणि दमा या दोन आजारांमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. अनेक तरुणही या आजाराचे बळी ठरत आहेत.
श्वसन रोगापासून बचावण्यासाठी उपाय
१) लसीकरण करून घ्या. विशेषत: फ्लू आणि न्यूमोनियाचे लसीकरण.
२) संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या.
३) हात पूर्णपणे स्वच्छ धुवा.
४) घर स्वच्छ ठेवा
५) ॲलर्जी आणि प्रदूषणापासून दूर राहा.