Amla Benefits:आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे दररोज सेवन केल्याने केस आणि त्वचेचे अनेक फायदे होतात. आवळ्याचा रस असो किंवा आवळ्याचा मोरावळा असो; आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन केले जाते. हिवाळ्याच्या दिवसात आवळा खाणे अधिक गुणकारी मानले जाते. अनेक जण आवळ्याचे सेवण सकाळी करतात; परंतु तुम्ही आवळा रात्रीसुद्धा खाऊ शकता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरीर डिटॉक्स करण्यासाठी

आवळा रात्रीदेखील सेवन करू शकता. मात्र, रात्री कच्चा आवळा खाल्ल्यास सर्दी होऊ शकते. आपण रात्री आवळ्याचे पाणी पिऊ शकता. आवळा पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि विषारी घटक शरीरातून सहज निघून जातात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

आवळ्याचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते आणि केस मजबूत होतात. तुमचे केस गळत असतील किंवा पांढरे होत असतील, तर तुम्ही आवळा पाणी पिऊ शकता. हे केसांना मुळांपासून मजबूत आणि पोषण देते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

आवळा पाणी वजन कमी करण्यासाठीदेखील खूप चांगले आहे. हे चयापचय गतिमान करते आणि चरबी बर्न करते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन खूप वेगाने कमी होते. त्यामुळे झोपही सुधारते.

हेही वाचा: गोड, ताजी स्ट्रॉबेरी कशी ओळखावी? विकत घेताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

आवळ्याचे पाणी कसे बनवायचे?

आवळा पाणी बनविण्यासाठी १-२ आवळे कापून, ते तुकडे एका ग्लास पाण्यात भिजवा. आता दोन ते तीन तास ते तसेच राहू द्या. काही वेळाने ते गाळून प्या. तुम्ही ते रात्री पाण्यात टाकून सकाळी पिऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many benefits of eating amla not only in the morning but also at night learn the right way to eat sap