हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, रयतेचे वाली असणारे महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे आपले अपुरे स्वप्न शहाजीराजांनी आपल्या मुलात पाहिले होते. त्यावेळी अवघ्या बारा वर्षांच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थाने सार्थ केली. शहाजीराजांनी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्याच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे. म्हणूनच महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याप्रती आदर असणाऱ्या प्रत्येकानचं या राजमुद्रेचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
मखाणा कसा तयार करतात माहितीये का?
महाराजांची ‘राजमुद्रा’ नेमकी काय सांगते
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत
IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
Arvind Sawant
Arvind Sawant Apologise : गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांनी व्यक्त केली दिलगिरी, पण ‘या’ नेत्यांची नावे घेत म्हणाले…

‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. त्या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.

इंग्रजी अर्थ:

The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.