महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. २७ फेब्रुवारीला जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याची परंपरा आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, सन्मानासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याचा हा गौरव दिवस आहे. मराठी भाषा अनेकांसाठी नेहमी कुतूहलाचा विषय आहे. ही भाषा तुम्ही वापरता तसं तिचं सौंदर्य खुलत जाते.
यामुळे मराठी भाषेच्या अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने आज आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवल्या पाहिजे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्रामच्या माध्यमातून या शुभेच्छा पाठवत मराठी भाषेचा गौरव साजरा करा. यासाठी आम्ही तुम्हाला १० मराठमोळ्या शुभेच्छा सुचवत आहे. वाचा या शुभेच्छा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा