Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes : महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती अन् साहित्याचा हा गौरव दिन आहे.

यानिमित्ताने तुम्ही मराठी भाषेच्या अभिमान बाळगणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवू शकता. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या माध्यमातून शुभेच्छांसह HD Image, Greeting पाठवत मराठी भाषेचा गौरव साजरा करू शकता. (Marathi Bhasha Din 2025 Wishes, Messages, Quotes, Status Greetings in Marathi)

मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Happy Marathi Bhasha Gaurav Din Wishes In Marathi

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes in marathi
मराठी भाषा गौरव दिन २०२५ शुभेच्छा संदेश

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

Happy Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes in marathi
मराठी भाषा गौरव दिन २०२५ शुभेच्छा संदेश

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes in marathi
मराठी भाषा गौरव दिन २०२५ शुभेच्छा संदेश

मराठी म्हणजे गोडवा,
मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी,
मराठी म्हणजे महाराष्ट्र,
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा |Makar Marathi Bhasha Gaurav Din Quotes In Marathi

ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
प्रत्येक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा,
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Language Day shubhechha Quotes Whatsapp Status Photo Messages
मराठी भाषा गौरव दिन २०२५ शुभेच्छा

जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई गं’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

रुजवू मराठी, फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माय मराठी, साद मराठी
भाषांचा भावार्थ मराठी,
बात मराठी, साथ मराठी
जगण्याला या अर्थ मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi bhasha din shubhechha Quotes Whatsapp Status Photo Messages in marathi
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२५

लोकसत्ता.कॉमतर्फे वाचकांनाही मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Story img Loader