मारुती सुझुकीने आपल्या ‘बलेनो’ या कारचं फेसलिफ्ट व्हर्जन आज लाँच केलं आहे. 5.45 लाख रुपये ते 8.77 लाख रुपये इतकी या कारची एक्स शोरुम किंमत आहे. या नव्या फेसलिफ्ट बलेनोत आतून आणि बाहेरुन काही अपडेट्स देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नवे सेफ्टी फीचर्स देखील यामध्ये देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी बलेनो बोल्ड व स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम इंटेरियरसह येईल. यामध्ये स्पीड अलर्ट सिस्टीम, को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर आणि रिअर पार्किंग सेंसर्स यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये ड्युअल एअरबॅग्स, ISOFIX चाइल्ड सेफ्टी सीटही आहे.
आताप्रमाणेच ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांमध्ये असेल. यामध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन असून ते 83 bhp ची पावर आणि 115 Nm टॉर्क तयार करतो. 1.3 लीटरचे डिझेल इंजिन असून ते 74 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क तयार करतो.

वर्ष 2016 पासून बलेनो भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. याशिवाय सर्वात जलद 5 लाख युनिट विकण्याचा(38 महिने) विक्रमही बलेनोच्या नावावर आहे. 11 हजार रुपयांमध्ये ग्राहकांना या कारसाठी बुकिंग करता येणार आहे.