Maruti Suzuki भारतीय बाजारात 21 नोव्हेंबर रोजी आपल्या नव्या Ertiga एमपीव्हीचं(मल्टी पर्पज व्हेइकल) नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या Ertiga ची जागा नवी Ertiga घेणार आहे. Ertiga चं नवं मॉडेल कंपनीच्या सर्व डिलर्सकडे उपलब्ध झाल्यानंतर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलचं उत्पादन पूर्णतः थांबवण्यात येणार आहे. नवं मॉडेल लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेलचं नाव बदललं जाईल अशी शक्यता आधी वर्तवली जात होती, मात्र नवं मॉडेल लाँच झाल्यानंतर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलचं उत्पादन पूर्णतः थांबवण्यात येणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

मारुती सुझुकीने एप्रिल 2012 मध्ये Ertiga चं सध्या बाजारात असलेलं मॉडेल लाँच केलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये या मॉडेलचं मिड-सायकल अपडेट आणलं होतं. 2012 मध्ये लाँचिंग झाल्यापासून आतापर्यंत कंपनीने जवळपास 4.2 लाख युनिट्सची विक्री केली आहे. सध्याचं मॉडेल 1.4-लिटर पेट्रोल आणि 1.3-लिटर डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. लाँचिंगच्या काही काळानंतर कंपनीने पेट्रोल व्हर्जन 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह सादर केलं होतं.

मारुतीची Ertiga ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. मिड-साइज बजट एमपीव्हीमध्ये ही कार बरीच पॉप्युलर आहे. या सेगमेंटमध्ये होंडा बीआर-व्ही, रेनॉ लॉजी आणि काही महिन्यांपूर्वीच लाँच झालेल्या महिंद्रा मराजोचा समावेश आहे.