मारुती सुझुकी कंपनीने स्टेज 6 प्रकाराचं इंजिन असलेली आपली प्रीमियम हॅचबॅक हायब्रिड मारुती सुझुकी बलेनो भारतात लाँच केली आहे. हे 1.2 लीटरचं ड्युअल व्हीव्हीटी बीएस6 इंजिन स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह येतं. या नव्या मॉडलची एक्स–शोरुम किंमत 5.58 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही नवी हॅचबॅक सीव्हीटी गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल तसंच यामध्ये दोन पेट्रोल मॉडेल एक नॉर्मल 1.2 लीटर आणि दूसरं स्मार्ट हायब्रिड व्हर्जन मार्केटमध्ये उपलब्ध असेल.
हे इंजिन दर्जेदार सेटिंग्ससह येतं आणि यामुळे पेट्रोलची बचत होते असा दावा कंपनीने केली आहे. नेक्सा डिलरशिपमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. नवं इंजिन उत्तम डिझाइन आणि तंत्रज्ञानासह सादर केलं जात आहे, हे इंजिन बनवताना पर्यावरणाचा देखील विचार करण्यात आला आहे असं कंपनीने म्हटलं.
2019 मध्ये आलेली ही नवी बलेनो म्हणजे ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे. नवीन मॉडेल हे ‘परिपूर्ण पॅकेज’ असून यामध्ये छोटी लीथियम–इऑन बॅटरी असून ही बॅटरी थेट इंजिनसोबत जोडण्यात आली आहे. नव्या बलेनोमुळे होणारे वायू प्रदूषण साधारण गाडीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटणार आहे असंही कंपनीचं म्हणणं आहे. यापूर्वी यावर्षीच्या सुरूवातीलाच कंपनीने बलेनोमध्ये फेसलिफ्ट हे नवं अपडेट दिलं असून ते देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. मागील आर्थिक वर्षात दोन लाखांहून अधिक बलेनो मॉडेल्सची विक्री झाली असून, या गाडीचा ५.५ लाख इतका मोठा ग्राहकवर्ग आहे.