सकाळपासून रात्रीपर्यंत बाहेरच्या धूळ, धूर, सूर्यकिरणे आणि इतर अनेक गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावरची चमक कमी होत असते. घरी आलो की, आपला चेहरा खूपच काळवंडल्यासारखा आणि थकल्यासारखा दिसतो. या सर्व गडबडीमधून रात्री आपल्या त्वचा, चेहऱ्याची काळजी घेण्याची फारशी ताकद आपल्यामध्ये उरलेली नसते. परंतु, चेहऱ्यावर तजेला येण्यासाठी, त्वचा सुंदर करण्यासाठी तुम्ही केवळ एका गोष्टीची मदत घेऊ शकता आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या घरात असणारे खोबरेल तेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खोबरेल तेलामध्ये असणाऱ्या फॅटी अॅसिड्स आणि अँटिऑक्सिडंट अशा घटकांमुळे नारळाचे तेल आपल्या त्वचा, चेहऱ्यासाठी फार उपयोगी असल्याचे समजते. तेलाचे काही थेंब आपल्या हातावर घेऊन, चेहऱ्यावर लावा आणि त्याने छान मसाज करून घ्या. त्वचेची आग / जळजळ होत असल्यास ती कमी करणे, त्वचा मऊ अन् मुलायम करणे यांसारख्या कितीतरी गोष्टींसाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा : घरामध्ये हेअर स्पा करणे होईल शक्य; चमकदार केसांसाठी ‘या’ सोप्या आणि घरगुती स्टेप्सकडे द्या लक्ष

कोरडी त्वचा असलेल्यांसाठीसुद्धा खोबरेल तेलाची खूप मदत होऊ शकते. कारण- तेलामध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचा मॉइश्चराइज्ड होऊन त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होतो, असे वेब एमडीच्या माहितीवरून समजते.

तर अशा या खोबरेल तेलाचा उपयोग आपली त्वचा मऊ आणि चमकदार करण्यासाठी कसा करायचा ते पाहू.

सर्वप्रथम हलक्या कोमट खोबरेल तेलाचे काही थेंब आपल्या हातावर घेऊन, ते चेहऱ्याला लावावे.
हलक्या हाताने चेहऱ्याला काही मिनिटांसाठी मसाज करून घ्या.
त्यानंतर एका पातेल्यात पाणी तापवून घ्या आणि त्या गरम पाण्यात टॉवेल भिजवून घ्या.
टॉवेल व्यवस्थित पिळून घ्या आणि चेहऱ्यावर ठेवा.
१० मिनिटांनंतर चेहऱ्यावरील टॉवेल काढून घ्या आणि पाण्याने तोंड स्वच्छ धुवून घ्या.

चेहऱ्याला खोबरेल तेल लावण्याचे फायदे आणि टिप्स

१. मॉइश्चरायझर

तुमच्या स्किन केअरच्या सर्वांत शेवटी खोबरेल तेल चेहऱ्यावर लावा. तसे केल्याचा फायदा तुम्हाला नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखा होऊ शकतो.

२. सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव

सूर्याची अतिनील किरणे आपल्या शरीर, त्वचेसाठी हानिकारक असतात हे आपण जाणतोच. अशामध्ये खोबरेल तेल एका चांगल्या सनस्क्रीनप्रमाणे काम करू शकते. तेल लावल्यास, तुमचे अतिनील किरणांपासून रक्षण होते. तसेच प्रखर सूर्यकिरणांमुळे तुमची त्वचा भाजून निघणार नाही आणि त्वचा तुकतुकीत राहण्यास मदत होऊ शकेल, अशी माहिती ‘जागरण’च्या एका लेखावरून मिळते.

३. दाहकता कमी करणे

त्वचेला जळजळ, दाह होत असल्यास तो कमी करण्यासाठी खोबरेल तेल मदत करू शकते. या तेलामधील दाहविरोधी घटक जळजळ होण्यापासून आपले संरक्षण करतात, असे एनआयएच [NIH]च्या एका माहितीवरून समजते.

४. मेकअप काढण्यासाठी…

मेकअप करताना मुळातच आपण अनेक अनैसर्गिक उत्पादनांचा वापर करीत असतो. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. एखाद्या क्लिंजर किंवा मेकअप रिमूव्हरसारखा तेलाचा वापर केल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.

हेही वाचा : केसांना घनदाट व चमकदार ठेवेल घरातील ‘हा’ एक पदार्थ; पाहा या सहा पद्धती

पुरळ किंवा पिंपल्स असल्यास तेलाचा वापर नको

खोबरेल तेलाचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. परंतु, जर तुमची त्वचा तेलकट असेल; त्यावर पिंपल्स येत असतील, तर चेहऱ्यावर तेल लावणे किंवा तेलाने मसाज करणे शक्यतो टाळावे.

[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massage your face with coconut oil at night use this simple tips for soft and glowing skin dha
Show comments