दसऱ्यानंतर दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरु होते. मग घराघरांत यंदा कोणत्या फॅशनचा ड्रेस किंवा साडी घ्यायची याच्या चर्चांना उधाण येते. सगळ्यांमध्ये आपण वेगळे आणि हटके दिसावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यामध्ये कपड्यांबरोबरच दागिन्यांचाही महत्त्वाचा भाग असतो. मात्र यासाठी कोणत्या कपड्यांवर कसे दागिने घालावेत आणि सध्या बाजारात काय नवीन आले आहे याबाबतची माहिती असणे आवश्यक असते. दागिन्यांमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये त्या-त्या प्रांतातील परंपरा, संस्कृती, कला यांचे संगम दिसून येतो. पारंपरिक संस्कृतीचा आणि आधुनिकतेचा मेळ साधत काही डिझायनर्स अप्रतिम दागिने बनवतात. जाणून घेऊया साधे-सोपे पण सहज भुरळ घालणाऱ्या दागिन्यांबद्दल, ज्यामुळे ह्या दिवाळीसाठी तुम्हाला हटक्या पद्धतीने सजता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रेसलेट मंगळलसूत्र :

मंगळसूत्र हा दागिना प्रत्येक महिलेचा सर्वात जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकदा मंगळसूत्र हे परंपरा राखण्यासाठी तसेच फॅशन म्हणूनही घातले जाते. मागच्या काही काळात जीवनशैलीनुसार दागिन्यांची स्टाईल सुद्धा बदलत गेली. त्याची जागा सुटसुटीत नक्षीदार पण आकाराने लहान असलेल्या मंगळसूत्राने जागा घेतली. यामध्ये मुख्यतः सोने, काळे मणी, मोती किंवा हिऱ्यांचे कोंदण देऊन तयार केले जातात. छोट्या आकारातील कॅरेटलेन सारखी ब्रेसलेट मंगळसूत्र वजनाने हलके, रोज वापरण्यास योग्य, भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही कपड्यांवर सूट होतात. इतकेच नाही तर ही मंगळसूत्रे दिसायलाही सुबक असतात. त्यामुळे बाजारामध्ये यांची मागणी वाढत असल्याचे दिसते.

ब्रेसलेट :

ब्रेसलेट हा पारंपरिक बांगडीचाच एक प्रकार आहे. परंतु याची शैली आणि यावर करण्यात येणारे कोरीव काम जास्त महत्त्वाचे असते. यांचा आकार काहीसा मोठा असतो त्यामुळे तो सहज उठून दिसतो. कडं किंवा ब्रेसलेट घातल्यावर अनेकींना बांगड्या घालण्याची गरज भासत नाही. कड्यांवर हिरे, मोती आणि पाचूंच कोंदण असतं. त्यामुळे हे पारंपरिकसोबत कॅज्युअल कपड्यांवरही सहज सूट होते.

कानातले :

स्टड, हूप, ड्रॉप, डांगले अशाप्रकारचे अनेक कानातले सध्या बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या लुकसाठी वेगळी कानातली असतात. ज्याप्रमाणे आपण कपडे मॅचिंग घेतो त्याचप्रमाणे कानातल्याचे चांगले कलेक्शन असेल तर सणावाराच्या काळात आपल्याला एखाद्या साडी किंवा ड्रेसवर घालायला काहीच नाही असा प्रश्न निर्माण होत नाही. यावर सोने – चांदी सह हिरे-मोती यांचाही वापर केला जातो. सहसा आपण पारंपरिक कानातले पाहतो. मात्र फुलपाखरु किंवा असेच काही हटके डिझाईनमध्ये असणारे कानातलेही छान लुक देऊन जातात.

अंगठी :

अनिव्हर्सरी रिंग, अँटिक रिंग, बर्थ स्टोन रिंग, क्लस्टर रिंग, एंगेजमेंट रिंग असे रिंग चे अनेक प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक रिंगची एक वेगळी ओळख असते. त्यानुसार त्याची डिझाईन तयार केली जाते. वेगवेगळ्या थीमनुसार रिंग बनवली जाते. पण यातही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, कपड्यांच्या स्टाईलप्रमाणे आणि किमतीनुसार अंगठीची निवड करु शकता. महिलांनी अंगठी घातल्यास त्यांच्या हाताला छान लूक येतो. यातही, खडे, मोती यांसारख्या अंगठ्यांना जास्त मागणी असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Match the jewelry with your dress in diwali important fashion tips
Show comments