Full Day Meal Plan For Winter : हिवाळा हा ऋतू सकाळी व दुपारी उबदार, तर संध्याकाळी थंड असणारा ऋतू आहे. पण, तो आपल्या आरोग्यासाठी आव्हानेदेखील घेऊन येतो. जसे की, कोरडी त्वचा, कमी प्रतिकारशक्ती व मंद पचन. त्यामुळे शरीराचे आरोग्य राखण्यासाठी, आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर पूर्ण दिवसभर तुम्ही थंडीत काय खाल्ले पाहिजे याची एक यादी दिली आहे(Full Day Meal Plan For Winter). हे पदार्थ शरीराला उबदार, पोषण व उत्साही ठेवण्यासाठी हंगामी अन्नावर लक्ष केंद्रित करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिवाळ्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेला पूर्ण दिवसाच्या जेवणाचा जबरदस्त प्लॅन पुढीलप्रमाणे (Full Day Meal Plan For Winter)…
१. सकाळी धण्याचे पाणी प्या – धण्याचे पाणी पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करा. हे पेय शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते, पचन वाढवते, जळजळ कमी करते. कोथिंबिरीच्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
२. नाश्ताला भाज्यांचे पोहे – हंगामी भाज्यांचा समावेश असलेले पोहे खाणे आरोग्यदायी ठरू शकते. कारण- पोहे हलके, पचायला सोपे आणि शाश्वत ऊर्जा देतात. पोह्यांमधे भाज्या जोडल्याने फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे यांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात पौष्टिक आहाराने होते.
३. मिड-मॉर्निंग स्नॅक – सकाळी एक ग्लास काळं गाजर (black carrot) तुमची तहान भागवते आणि तुमच्या आतड्यांचे पोषणही करते. हे आंबवलेले प्रो-बायोटिक पेय पचन आणि प्रतिकारशक्तीसाठी उत्कृष्ट आहे. अँथोसायनिन्सने समृद्ध असलेले काळं गाजर त्वचेच्या आरोग्यासाठी आणि जळजळीसाठीही उत्तम आहे.
४. दुपारचे जेवण – पुदीना-कोथिंबीर चटणीसह मेथी, बाजरीची भाकरी दुपारच्या जेवणासाठी योग्य आहे. एक ते दोन जुड्या मेथी आणि बाजरी यांची भाकरी असा आहार दुपारी जेवताना घ्या. कारण- बाजरी शरीराला उबदार ठेवते आणि ऊर्जा प्रदान करते; तर मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते व पचनास समर्थन देते. पुदीना आणि कोथिंबिरीची चटणी झिंक आणि अँटिऑक्सिडंट्सचा समावेश करते.
५. दुपारच्या जेवणानंतर ओवा – ओव्याचे पाणी दुपारच्या जेवणानंतर प्या. एक कप ओव्याचे पाणी पचनास मदत करते, पोट फुगण्याला प्रतिबंध करते आणि चयापचयला समर्थन देते. हे पेय विशेषतः हिवाळ्यात जेवणानंतर पोट जड वाटणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे (Full Day Meal Plan For Winter).
६. संध्याकाळचा नाश्ता – संध्याकाळी थंडी पडली की, भाजलेल्या मखानाबरोबर ग्रीन टीचे सेवन करा. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर, मखाना जास्त कॅलरीज न जोडता प्रथिने आणि आवश्यक पोषक घटक शरीराला पुरवतात.
७. रात्रीचे जेवण – रात्री ब्रोकोली आणि गाजराचे एक वाटी सूप प्या. हे कमी कॅलरीजचे डिनर फायबर, जीवनसत्त्वे व खनिजांनी भरलेले आहे, ज्यामुळे ते पौष्टिक आणि पचायला सोपे आहे.
आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनीदेखील विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी हिवाळ्यातील सर्वोत्तम पदार्थ सुचवले आहेत (Full Day Meal Plan For Winter)…
- थायरॉईड : थायरॉईड ग्रंथीच्या कार्याला मदत मिळावी यासाठी कलोंजी (काळ्या बिया) आणि धणे बियांच्या चहाने तुमचा दिवस सुरू करा.
- मधुमेह : मेथी आणि बाजरीची भाकरी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहे.
- आतडे : काळी गाजर नैसर्गिक प्रो-बायोटिक म्हणून काम करते.
- त्वचा : तेजस्वी त्वचेसाठी तुमच्या जेवणात लाल गाजराच्या कोशिंबिरीचा समावेश करा.
- प्रतिकारशक्ती : ताजे आले आणि हळद यांचा चहा हा संक्रमणांशी लढण्यासाठी एक पॉवरहाऊस आहे.
- केस : लोह आणि ओमेगा -3 समृद्ध अळिवाच्या बियांचे लाडू (Aliv seeds ladoo) केस मजबूत करतात आणि हिवाळ्यात केस गळणे टाळतात.