वैज्ञानिकांनी अन्न ताजे की शिळे हे ओळखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नाकाची निर्मिती केली आहे. या नाकसदृश उपकरणाचे नाव पेरेझ असे असून, ते अन्नपदार्थ शिळे की ताजे हे तपासण्यासाठी तयार केले आहे.
 शिळे अन्न आरोग्यास हानिकारक असते व काही वेळा त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका असतो. मांस, डुकराचे मांस, कोंबडी व मासे यांचा ताजेपणा किंवा शिळेपणा यात तपासता येतो. यात वापरकर्त्यांने हे यंत्र अन्नाच्या डिशवर धरायचे, त्यानंतर लगेचच ते शिळे की ताजे हे समजते. या यंत्रात चार संवेदक असतात, ते तापमान, आद्र्रता, अमोनिया व इतर अस्थिर सेंद्रिय संयुगांची नोंद घेतात. मग ही माहिती वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनला ब्लूटूथमार्फत दिली जाते. सगळी माहिती मिळाल्यानंतर संबंधित अ‍ॅप हे त्या अन्नाचा ताजेपणा किंवा शिळेपणा सांगते, असे गिझमॅग नियतकालिकात म्हटले आहे. पेरेझ या उपकरणातील संवेदक अन्नातील १०० विविध सेंद्रिय संयुगे ओळखतात व त्यांच्या मदतीने अन्न ताजे की शिळे तसेच खाण्यास योग्य की अयोग्य हे सांगितले जाते.

Story img Loader