मधुमेहाने ग्रासलेल्यांनी आपल्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसातून वेगवेगळ्या वेळी थोडे-थोडे खाण्यापेक्षा दिवसात एकदाच भरपूर खावे आणि ‘ब्रेकफास्ट’ टाळावा.
स्विडनमधील लिंककोपींग विद्यापीठातील संशोधकांनी मधुमेही व्यक्तीच्या दररोजच्या जेवणाच्या वेळा आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तातील शर्करेचे प्रमाणावर होणारा परिणाम इतर काही गोष्टींचा मुलभूत अभ्यास केला. यातून दिवसात वेगवेगळ्या वेळी जेवण घेण्यापेक्षा एकदाच भरपेट जेवणे मधुमेहींसाठी चांगले असल्याचे आढळून आले.
संशोधकांनी एकूण २१ मधुमेह रुग्णांची तीन वेगवेगळ्या आहारातून चाचणी केली. कमी-स्निग्ध आहार, कमी-कायब्रोहायड्रेट आहार आणि भूमध्य म्हणजेच दिवसातून एकदाच भरपेट आहार या तीन आहारांच्या प्रकारावर परिक्षण केले.
यावरून दिवसातून एकदाच आहार करणे मधुमेहींसाठी योग्य आहार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दिवसातून वेगवेगळ्या वेळी थोडे-थोडे खाण्यापेक्षा फक्त एकदाच योग्य आहार मधुमेहींनी करावा असे या संशोधकांचे म्हणणे आहे.
मधुमेहींसाठी एक चांगला सल्ला..एकदाच जेवण आणि ‘ब्रेकफास्ट’ टाळा
मधुमेहाने ग्रासलेल्यांनी आपल्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसातून वेगवेगळ्या वेळी थोडे-थोडे खाण्यापेक्षा दिवसात एकदाच भरपूर खावे आणि 'ब्रेकफास्ट' टाळावा.
आणखी वाचा
First published on: 02-12-2013 at 06:16 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mediterranean diet without breakfast best for diabetics