२०२५ ची पहाट केवळ नवीन वर्षच नाही, तर एक नवीन पिढी म्हणजेच जनरेशन बीटा घेऊन आली आहे. जनरशेन बीटाचेच पहिले बाळ फ्रँकी रेमरुआतडीका झाडेंग हे भारतातील मिझोराममधील आयझॉल येथे जन्माला आले. १ जानेवारी रोजी मध्यरात्री १२.०३ वाजता या बाळाचा जन्म झाला
३.१२ किलो वजनाची फ्रँकी एका नव्या पिढीच्या प्रारंभाचे प्रतिनिधित्व करीत आहे. प्रसिद्ध ज्योतिष मार्क मॅकक्रिंडल केलेल्या भविष्यवाणीनुसार, “जनरेशन बीटाचे जीवन हे अभूतपूर्व तांत्रिक एकीकरण (technological integration) आणि सामाजिक उत्क्रांतीद्वारे (societal evolution) प्रभावित होईल.”
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वनलालकिमा यांनी पीटीआयला सांगितले, “या बाळाचा जन्म कोणत्याही गुंतागुंतीशिवाय झाला आहे.”
फ्रँकी आणि इतर बीटा जनरशेनमधील बाळे ही कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन व जागतिक कनेक्टिव्हिटीमधील प्रगतीसह प्रगत तंत्रज्ञानाच्या जगात वाढतील. पण, ही पिढी इतकी खास कशामुळे आहे आणि ती पिढीच्या टाइमलाइनमध्ये कोणत्या स्थानी आहे जाणून घेऊ…
जनरेशन बीटा कोण आहेत?
ऑस्ट्रेलियन ज्योतिष मार्क मॅकक्रिंडल यांनी तयार केलेल्या टाइमलाइनुसार जनरेशन बीटामध्ये २०२५ ते २०३० दरम्यान जन्मलेल्या मुलांचा समावेश आहे. या व्यक्ती मिलेनियल्स (जनरेशन Y) आणि जनरेनश Z पालकांची अपत्ये असतील. McCrindle च्या मते, २०३५ पर्यंत Gen Beta च्या मुलांचा जागतिक लोकसंख्येच्या १६% वाटा अपेक्षित आहे, जी भविष्यातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील.
मॅकक्रिंडलने स्पष्ट केले, “जनरेशन बीटा ही बदलत्या जगाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे तंत्रज्ञान आणि वास्तविकता उत्तम प्रकारे मिसळते. जनरेशन बीटा शिक्षण, ऑफिस व मनोरंजन, सर्वत्र AI तंत्रज्ञान असेल्या जगात वाढेल, जे त्यांना अत्यंत आरामदायक आणि तंत्रज्ञानाने कुशल बनवेल.
“आम्ही त्यांना अल्फा आणि बीटा अशी नावे दिली आहेत; जेणेकरून फक्त नवीन पिढ्याच नव्हे, तर पहिल्या पिढ्या ज्या पूर्णपणे वेगळ्या जगाला आकार देतील. म्हणूनच आम्ही ग्रीक वर्णमालेकडे वळलो, हे सूचित करण्यासाठी की, या वेगवेगळ्या पिढ्या तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेच्या नवीन जगात कशा वाढवल्या जातील,” असे मॅकक्रिंडलने त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले.
हेही वाचा – छोले कुल्चे, लसुण नान, पनीर सारखे पदार्थ खाल्यानंतर आपल्याला इतकी तहान का लागते?
पिढ्यांचा कालखंड (A timeline of generations)
जनरेशन बीटाला टाइमलाइन कुठे स्थान आहे हे समजून घ्या..
- पिढीच्या जन्मवर्षांची मुख्य वैशिष्ट्ये
- सायलेंट जनरेशन १९२८ ते १९४५- दुसरे महायुद्ध आणि महामंदी यांनी आकार घेतलेले परंपरावादी आहेत.
- बेबी बूमर्स १९४६ ते १९६४- युद्धोत्तर समृद्धी, कुटुंबावर लक्ष केंद्रित करणे आणि आर्थिक वाढ यांवर जोर देणारे आहेत.
- पिढी एक्स (Generation X) १९६५ ते १९८०- स्वतंत्र, जुळवून घेणारे, तंत्रज्ञान स्वीकारणारे आहेत.
- मिलेनियल्स (Gen Y) १९८१ ते १९९६- डिजिटलचा पाया बांधणारे, सहयोगाने काम करणारे, अनुभवाचे मूल्य जाणणारे आहेत.
- जनरेशन Z १९९७ ते २०१०- पहिले खरे डिजिटल नेटिव्ह, सामाजिकदृष्ट्या जागरूक असतील.
- जनरेशन अल्फा २०११ ते २०२४- चिल्ड्रेन ऑफ मिलेनियल्स, उच्च तंत्रज्ञानाशी जुळवून घेतील.
- जनरेशन बीटा २०२५ ते २०३९- AI तंत्रज्ञानाच्या जगात वाढतील, पर्यावरणाचे रक्षण आणि करण्यासाठी कार्य करतील, जागतिक नागरिक म्हणून जगतील
जनरेशन बीटा हे आपण कसे जगतो, कार्य करतो आणि संवाद कसा साधतो आहोत याची नव्याने व्याख्या निर्माण करण्यासाठी सज्ज आहेत. आम्ही भारतातील पहिल्या जनरेशन बीटाचे आगमन साजरे करत असताना, जग नवीन्यपूर्ण कल्पना, अनुकूलता व परिवर्तनशील बदलाच्या युगासाठी सज्ज होत आहे.