वस्त्रे विणता विणता जीवनाचा गर्भितार्थ समजावून सांगणारे दोहे रचणारे संत कबीर आपल्या सगळ्यांनाच परिचयाचे असतील. वाराणसीच्या अरूंद गल्लीबोळांमध्ये चरितार्थासाठी रेशमी वस्त्रे आणि बनारसी साड्या विणताना कबीराच्या याच परंपरेशी नाते सांगणारे नाव म्हणजे मोहरम्म अली उर्फ हसन तुराबजी. वस्त्रे विणताना होणाऱा हातमागाचा विशिष्ट आवाज हेच मोहरम्म अलींच्या कवितांमागील प्रेरणास्थान. शाळेची पायरी कधीही न चढलेले मोहरम्म अलींचे हात हातमागावर जितक्या उत्कृष्टपणे चालतात, त्याच दर्जाचे काव्य ते अगदी सहजरित्या रचतात. वाराणसीतील स्थानिक मुशाहिरा, मजलिस आणि कवी संमेलनांमध्ये त्यांच्या कविता ऐकताना याचा प्रत्यय तुम्हाल येतो.
एक उत्कृष्ट विणकर आणि कवी असणाऱ्या मोहरम्म अलींचे वेगळेपण इथेच संपत नाही. साधारणत: काल्पनिक विश्वात आणि भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेणाऱ्या कवी माणसांसाठी काटेकोर आणि अचूकतेचे गणित पाळणारा यंत्राचा विषय हा तसा रूक्ष मानला जातो. मोहरम्म अलींचे वेगळेपण अधोरेखित होते ते इथेच. दोन वर्षांपूर्वी एका ‘लहान हातमागाच्या’ (mini handloom) निर्मितीचे पेटंट आणि राष्ट्रीय पुरस्कार देऊन भारत सरकारकडून त्यांचा गौरव करण्यात आला. पारंपरिक हातमागांवर काम करताना कारागिरांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. हीच गोष्ट लक्षात घेऊन मोहरम्म अली यांनी हाताळ
मोहरम्म अलींचा ‘कश्कन’ हा गझलांचा समावेश असणारा कवितासंग्रह २००२मध्ये प्रकाशित झाला होता. मात्र, अजूनही काही अडचणींमुळे त्यांच्या इतर कवितांचे प्रकाशन रखडलेले आहे. सध्या ते उर्दु साप्ताहिके आणि वृत्तपत्रांमधून कविता लिहत असतात. याशिवाय, सुप्रसिद्ध कवी गुलजार यांच्या हस्ते २००२ साली मिळालेला पुरस्कार माझ्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण असल्याचे ते सांगतात. एक संवेदनशील कवी म्हणून ओळख असलेले मोहरम्म अली यापुढील काळातही आपल्या लेखणीतून सामाजिक मुद्द्यांवर आणि विणकरांच्या दयनीय परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करताना दिसतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा