पुरूष वयाच्या ४६व्या वर्षा नंतर स्वत:च्या दिसण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तर महिला मात्र, पुरूषांपेक्षा १३ वर्षे अधीक त्यांच्या दिसण्याची काळजी घेतात असे एका अभ्यासामधून समोर आले आहे.
पुरूष वयाची ४६शी ओलांडल्या नंतर फॅशन करत नाहीत. त्याही पेक्षा ते त्यांच्या प्रकृतीकडे देखील दुर्लक्ष करतात असे या संशोधनातून समोर आले.
त्या उलट महिला वयाच्या ५९ व्या वर्षापर्यंत त्यांच्या दिसण्याची काळजी घेतात. असे २००० लोकांच्या सर्वेक्षामध्ये दिसून आले. सर्वेक्षण केलेल्या व्यक्तिंमधील चारपैकी एक व्यक्ती त्यांना चांगले दिसण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याचे म्हणाल्या. तीन व्यक्तिंपैकी दोन व्यक्तिंच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी चांगले दिसण्याची काळजी करणे दुय्यम ठरते असे ‘मेट्रो.को.यूके’ने प्रसिध्द केले.
“आरामदायी जीवनामुळे चांगले दिसणे दुय़्यम ठरते”, असे हे सर्वेक्षण केलेल्या ‘बेनेंन्डेन हेल्थ’ संस्थेचे पाउल किनान यांनी सांगितले.
“आपण किती जास्त जगतो हे आपण सर्वजण नेहमी वाचतो. आरोग्य शास्त्राला आपण त्याबद्दल धन्यवाद द्यायला हवे. मात्र, आपल्यातले किती लोक वाढत्या वयाबरोबर आपली प्रकृती चांगली राहण्याची काळजी घेतात?”, असा प्रश्न किनान यांनी उपस्थित केला.
वाढत्या वयाबरोबर पुरूषांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष!
पुरूष वयाच्या ४६व्या वर्षा नंतर स्वत:च्या दिसण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तर महिला
First published on: 19-09-2013 at 06:28 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men stop trying to look good at