मुलींसाठी मासिक पाळीच्या काळात होणारी वेदना फक्त ही एकच चिंतेची बाब नसते तर पीरियड्समुळे होणारे डाग आणि वारंवार पॅड बदलणे ही देखील एक समस्या असते. बहुतेक मुली या काळात साधारण पॅड वापरतात. सामान्य कपडा वापरण्यापेक्षा पॅड वापरणे अधिक सोयीचे ठरते, परंतु पॅडपेक्षाही मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर अधिक फायद्याचा असतो. या कप्सचा वापर केल्याने वारंवार पॅड्स बदलणे, ओलसरपणा, डाग, घाज यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल. सोबतच हे कप्स पर्यावरणासाठी देखील फायदेशीर आहे कारण आपण वर्षानुवर्षे यांचा वापर करू शकतो. अनेक मुलींनी मासिक पाळी दरम्यान पॅडऐवजी हे कप वापरण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेन्स्ट्रुअल कप्स वापरण्याचे फायदे

मासिक पाळीच्या काळात पॅड्समुळे जी दुर्गंधी निर्माण होते ती या कप्सच्या वापरामुळे होत नाही. कारण यावेळी रक्त शरीरातच राहते, ते हवेच्या संपर्कात येत नाही.

Hair Oil Tips : तुम्हीही केसांना लावण्यासाठी गरम तेलाचा वापर करता का? जाणून घ्या याचे फायदे-तोटे

तुम्हाला वारंवार पॅड्स बदली करावे लागत नाहीत. मेन्स्ट्रुअल कप्स ११ ते १२ तास वापरले जाऊ शकतात.

बहुतेक पॅडमध्ये सुगंध असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. या कप्सचे निर्जंतुकीकरण होत राहते ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही.

इंटिमेट एरियाची त्वचा जेव्हा पॅड्सने घासली जाते तेव्हा खूप वेदना आणि अस्वस्थता जाणवते. परंतु मेन्स्ट्रुअल कप्समुळे ही समस्या दूर होते.

मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर करून तुम्ही कशाचीही काळजी न करता पोहायला जाऊ शकता. तसेच एकदा सवय झाल्यावर तुम्ही जिम आणि इतर शारीरिक कामे आरामात करू शकता.

मेन्स्ट्रुअल कप्स पॅड किंवा टॅम्पॉनपेक्षा ५ पट अधिक रक्त शोषतात.

फक्त जेवणासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त ठरतो कडीपत्ता; जाणून घ्या फायदे

पीरियड फ्लोच्या कोणत्याही टप्प्यात, तुम्हाला मेन्स्ट्रुअल कपकडे लक्ष देण्याची गरज नाही. याउलट, तुम्हाला तुमच्या हलक्या किंवा जड प्रवाहानुसार पॅड बदलावा लागतो.

मेन्स्ट्रुअल कप्स सुरुवातीला वापरणे कठीण आहे, परंतु एकदा का तुम्हाला सवय झाली की तुम्हाला पुन्हा कधीही पॅड वापरावेसे वाटणार नाही.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. अधिक तपशिलांसाठी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)