Christmas 2021 Best Gift Ideas For Partner : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. सांताक्लॉज रात्री १२ वाजता मुलांना ख्रिसमस गिफ्टचं वाटप करण्यासाठी बाहेर पडतात. त्याच वेळी, काही घरांमध्ये, कुटुंबातील सदस्य सिक्रेट सांताक्लॉज बनतात आणि आपल्या आवडल्या व्यक्तीच्या उशाखाली भेटवस्तू ठेवतात. खरं तर ख्रिसमस म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तींना भेटवस्तू देण्यासाठी एक निमित्तच असतं. जर तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरचे सीक्रेट सांताक्लॉज बनण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काही गिफ्ट आयडियाज घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्ही खूप पैसे खर्च करावेत असे नाही. केवळ फुले देऊन तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरला इम्प्रेस करू शकता. पण जर तुम्हाला तुमचं नातं खास ठेवायचं असेल तर या गिफ्ट आयडिया तुमच्यासाठी नक्कीच कामी येतील.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
pravin tarde birthday his wife snehal tarde
“भाईचा बर्थडे गाणं…”, प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहलची मिश्किल पोस्ट, म्हणाली…

स्किन केअर प्रोडक्ट्सचे किट
तुमच्या सुंदर जोडीदाराला स्किन केअर संबंधित काही प्रोडक्ट्स भेट म्हणून द्या. आजकाल अनेक ब्रँड गिफ्ट पॅकच्या रूपात अशा प्रोडक्ट्सची संपूर्ण किट्स मिळतात. जी एक उत्तम भेट म्हणून देता येऊ शकते.

लोकरीचे कपडे
जर तुमच्या जोडीदाराला हिवाळा आवडत असेल तर लोकरीच्या अनेक वस्तू आणि कपड्यांची भेट ही एक चांगली कल्पना असू शकते. मग ते स्वेटर असो वा सुंदर मफलर. प्रत्येकाला ही भेट नक्कीच आवडेल.

आणखी वाचा : Merry Christmas 2021: ‘या’ देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, इथल्या परंपरा आणि पद्धतींबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

गाण्यांचा संग्रह
जर तुमच्या पतीला किंवा बॉयफ्रेंडला गाणी आणि संगीत ऐकण्याची आवड असेल तर या ख्रिसमस डेच्या दिवशी तुम्ही त्यांच्या आवडत्या गाण्यांचा संग्रह करून त्यांना भेट देऊ शकता. ख्रिसमस डे ला दिलेली ही भेट तुमच्या जोडीदाराला आवडेल.

पर्सनलाइज्ड मॅसेजेस बॉटल
ख्रिसमस डे च्या दिवशी शुभेच्छांसोबतच जोडीदारासाठी तुमच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही पर्सनलाइज्ड मॅसेजची बाटली निवडू शकता. या बल्बच्या आकाराच्या बाटलीमध्ये ५२ स्लिप देण्यात येतात, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मनातल्या भावना लिहून तुमच्या बॉयफ्रेंड किंवा पतीला देऊ शकता. या भेटवस्तूमुळे त्यांना तुमचे प्रेम तर जाणवेलच पण तुमचे शब्द लक्षात ठेवण्यासही मदत होईल.

आणखी वाचा : Christmas 2021: जाणून घ्या ‘मेरी’ हा शब्द कुठून आला, हॅप्पी ऐवजी ‘Merry Christmas’ का म्हणतात?

पर्सनलाइज्ड कुशन
पर्सनलाइज्ड कुशन हा देखील एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा फोटो किंवा डिझाइन बनवून तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेट देऊ शकता. ही कुशन तुम्हाला झोपताना आठवण करून देईल.

सांता मग
सांताचे चित्र किंवा सांताचे आकार असलेले सिरॅमिक कॉफी मग देखील आजकाल ट्रेंडमध्ये आहेत आणि तुम्ही ते कोणत्याही स्थानिक गिफ्ट शॉपमधून खरेदी करू शकता आणि त्यांची किंमतही जास्त नाही. म्हणूनच गुप्त सांता भेट म्हणून सांता मग हा एक चांगला पर्याय आहे.

आणखी वाचा : Merry Christmas 2021 : ‘ख्रिसमस ट्री’ची सजावट करायचीय? मग या चार सोप्या डेकोरेशन आयडियाज एकदा नक्की वापरा

सजावटीचा कंदील
ख्रिसमसचे निमित्त आहे, त्यामुळे घराची सजावट करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ख्रिसमस गिफ्ट म्हणून तुमच्या आवडत्या व्यक्तीला डेकोरेटिव्ह पीस देखील देऊ शकता. डेकोरेटिव्ह कंदीलही सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

कस्टमाइज्ड फोटो फ्रेम
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बाजारातून कस्टमाइज्ड फोटो फ्रेम खरेदी करू शकता. यावर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एक गोंडस संदेशही लिहू शकता. जे त्यांचे येणारे वर्ष आणखी आनंदी करेल.

आणखी वाचा : Christmas 2021 : Amazon ची ख्रिसमस ऑफर! प्रीमियम Chacolate वर सर्वात मोठी ऑफर, गिफ्टिंगसाठी ७५% डिस्काउंट

केवळ पुरुष जोडीदार नाही तर महिला देखील त्यांच्या जोडीदारांना स्किन केअर प्रोडक्स्ट्सची भेट देऊ शकतात. ज्यामध्ये शेव्हिंग किटपासून ते ग्रूमिंगपर्यंत अनेक वस्तू असतात. या सोप्या गिफ्ट आयडियाज तुमच्या जीवनात गोडवा आणण्यासाठी मदतीचे ठरतील. तसंच, जोडीदाराला हे समजेल की त्यांचा जोडीदार त्यांची सर्व प्रकारची काळजी घेतो.