Merry Christmas 2021 : डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्याच वेळी, वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात, वर्षातील शेवटचा मोठा सण येतो, ज्याची जगभरात अनेक देशांमधील लोक प्रतीक्षा करतात. डिसेंबर महिना सुरू झाला की लोकांची प्रतीक्षा संपुष्टात येऊ लागते. ख्रिसमस डे दरवर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बहुतेक मुले ख्रिसमसच्या दिवसाची वाट पाहत असतात. हा विशेष सण येशूच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो, ज्यामध्ये सांताक्लॉज मुलांसाठी भेटवस्तू आणतात. यावेळी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. तुम्ही एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा संदेश पाठवा. पण इतर सणांप्रमाणे आपण नाताळमध्ये हॅप्पी ख्रिसमस म्हणत नाही तर ‘मेरी ख्रिसमस’ म्हणतो हे कधी लक्षात आलं आहे का? दिवाळीच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा किंवा हॅप्पी ईस्टरसारखं आपण हॅपी ख्रिसमस का म्हणत नाही? ‘मेरी’ या शब्दाचा अर्थ काय आहे आणि ख्रिसमसमध्ये हॅपी ऐवजी ‘मेरी’ हा शब्द का वापरला जातो? ख्रिसमसमध्ये मेरीचा अर्थ जाणून घेऊया…

मेरी म्हणजे काय?
मेरीचा अर्थ आनंदी, सुखी आहे. मेरी हा शब्द जर्मनिक आणि जुन्या इंग्लिशचा मिलाफ आहे. सोप्या शब्दात, मेरीचा अर्थ आणि हॅपीचा अर्थ एकच आहे. पण ख्रिसमसमध्ये हॅप्पी ऐवजी ‘मेरी’ हा शब्द वापरला जातो.

Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vishwa hindu parishad
“आजारातून मुक्त होण्याचे आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न”, ख्रिसमस कार्यक्रम हिंदू संघटनांनी उधळला!
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Yogita Chavan & Saorabh Choughule
Video : सातजन्म हाच नवरा मिळूदेत! योगिता चव्हाणला ख्रिसमस आवडतो म्हणून पती सौरभने दिलं ‘असं’ Surpirse, पाहा व्हिडीओ
thane farmhouses party loksatta news
सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी
Julio Ribeiro Christmas memories loksatta article
ख्रिसमसच्या काही आठवणी…

हॅप्पी ऐवजी मेरी असे का म्हणतात?
‘मेरी’ हा शब्द प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी प्रचलित केला होता. त्यांनी त्यांच्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकात ‘मेरी’ हा शब्द सर्वाधिक वापरला, त्यानंतर हॅप्पी ऐवजी मेरी हा शब्द वापरात आला. त्यापूर्वी लोक हॅपी ख्रिसमस म्हणायचे. इंग्लंडमध्ये आजही अनेक लोक मेरी ऐवजी ‘हॅप्पी’ ख्रिसमस म्हणतात. दोन्ही शब्द बरोबर आहेत पण ‘मेरी’ हा शब्द प्रचलित आहे.

‘मेरी’ हा शब्द कुठून आला?
‘मेरी’ या शब्दाची उत्पत्ती १६ व्या शतकात झाली. त्यावेळी इंग्रजी भाषा बाल्यावस्थेत होती. नंतर १८ व्या आणि १९ व्या शतकात ते अधिक प्रचलित झाले. ख्रिसमस सोबत, हॅप्पीऐवजी मेरी हा शब्द जास्त वापरण्यात आला. पण ‘मेरी’ हा शब्द ख्रिसमसशिवाय इतर कोणत्याही सणात वापरला गेला नाही.

हॅपी ख्रिसमस म्हणायचं की मेरी ख्रिसमस?
‘मेरी ख्रिसमस’ प्रचलित आहे आणि बहुतेक देशांमध्ये, बहुतेक लोक ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात, परंतु आपण ख्रिसमसच्या शुभेच्छा म्हटल्यास ते चुकीचं होणार नाही. हॅपी ख्रिसमस आणि मेरी ख्रिसमसचा अर्थ सारखाच आहे, परंतु ‘मेरी’ या शब्दामुळे शुभेच्छा देणं अनेकांना अवघड जातं, म्हणून हॅप्पी ख्रिसमस म्हणतात. परंतु ते चुकीचे नाही.

Story img Loader