एमजी मोटर इंडियाने भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही एमजी अॅस्टर लॉंच केली आहे. याची खास प्रारंभिक किंमत ९.७८ रु. एवढी आहे. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि डिझाइन एक्सलन्ससह अॅस्टर ही प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेग्मेंटमधली गाडी आहे. ग्राहक स्टाइलपासून ते सुपर, स्मार्ट आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या शार्प व्हेरियन्टमधून आपल्या आवडीचे वाहन निवडू शकतात.
एमजी अॅस्टर एका स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये येते, ज्याच्यात तीन वर्षे/अमर्याद किलोमीटर्स, तीन वर्ष रोडसाइड असिस्टन्स आणि तीन लेबर फ्री पिरीयॉडिक सर्व्हिस समाविष्ट आहेत. अनोख्या माय एमजी शील्ड प्रोग्रामसह अॅस्टर ग्राहकांना वॉरंटी एक्स्टेंशन आणि प्रोटेक्ट प्लनसह आपले ओनारशिप पॅकेज निवडण्याची आणि पर्सनलाईझ करण्याची मुभा मिळते.
(हे ही वाचा: TVS ची नवी दमदार Apache RTR 160 4V बाइक भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)
अॅस्टरचा ओनरशिप खर्च फक्त ४७ पैसे प्रती किलोमीटर आहे, ज्याची गणना एक लाख किमी. पर्यंत करण्यात येते. या सेग्मेंटमध्ये पहिल्यांदाच अॅस्टरमध्ये ३-६० प्रोग्राम आहे. हा एक अशुअर्ड बाय बॅक प्लन आहे, ज्याच्या अंतर्गत खरेदीनंतर तीन वर्षांनी ग्राहकांना अॅस्टरच्या एक्स-शोरूम किंमतीच्या ६० टक्के मिळू शकतात. हा प्रोग्राम लागू करण्यासाठी एमजी इंडियाने कारदेखोशी भागीदारी केली आहे. अॅस्टर ग्राहक त्याचा स्वतंत्रपणे लाभ घेऊ शकतात.
एमजीच्या इमोशनल डायनॅमिझमच्या ग्लोबल डिझाइन
फिलॉसॉफीअनुसार अॅस्टरचे स्टायलिंग करण्यात आले आहे. स्मार्ट आणि शार्प व्हेरियन्टसाठी अॅस्टरच्या आय-स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये ८०+ कनेक्टेड कार फीचर्स आहेत. ऑटोनॉमस लेव्हल २ फीचर्सवाल्या एडीएएस २२० टर्बो एटीमध्ये पर्यायी पॅकच्या बरोबर शार्प व्हेरियन्टसाठी व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल.
(हे ही वाचा: फेस्टिवल ऑफर: Nissan आणि Datsun कारवर १ लाख रुपयांपर्यंत ऑफर; जाणून घ्या तपशील)
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, “अनेक फीचर्सनी समृद्ध आणि या सेग्मेंटमध्ये आधी न दिसलेल्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज ही एसयूव्ही या सेग्मेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेल.” ग्राहक आजपासून एमजीच्या विस्तृत नेटवर्क किंवा वेबसाइट (www.mgmotor.co.in) वर जाऊन अॅस्टरची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतात आणि प्री-रिझर्व करू शकतात. बुकिंग २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल आणि डिलिव्हरी नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू होईल.