मोबाईल निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स आपला नवा ‘लॅपटॅब’ प्रकारातला नवा टॅब लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. या लॅपटॅब प्रकारातल्या टॅबमध्ये विंडोज ८ कार्यपद्धती आणि अँड्रॉईड जेलीबीन कार्यप्रणाली असणार आहे.
हा लॅपटॅब येत्या फेब्रुवारी महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. १.४६ गेगाबाईट्स इंटेल केलरॉन प्रोसेसर या टॅबमध्ये देण्यात आला आहे. तसेच लॅपटॅबचा तब्बल १०.१ इंचाचा डिस्प्ले एका मिनी लॅपटॉपची जाणीव करुन देणारा ठरणार आहे. यात २ ‘जीबी’ची ‘रॅम’ असणार आहे. त्यामुळे या टॅबची कार्यपद्धतीही तितकीच जलद असेल अशी आशा आहे. एकूण ३२ जीबीची अंतर्गत मेमरी देण्यात येणार असल्याने वेगळ्या मेमरी कार्डची गरज ग्राहकांना भासेल असे वाटत नाही. तरीसुद्धा मेमरी कार्डद्वारे या टॅबची मेमरी ६४ जीबीपर्यंत वाढविता येईल.
“सध्या भारतात टॅब संस्कृतीने तग धरला असल्याने ग्राहकांना टॅब आणि लॅपटॉप या दोघांचे संमिश्र उपकरण बाजारात दाखल करणे आमचा मुख्य उद्देश होता. त्यातून आम्ही हा लॅपटॅब तयार केला. याला ग्राहकांची चांगली पसंती मिळेल असा विश्वास आम्हाला आहे.” असे मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी सांगितले        
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा