Monsoon Health Tips : आजकाल मायग्रेनची समस्या खूप सामान्य झाली आहे. चुकीची जीवनशैली, जंक फूडचे सेवन करणे, योग्य वेळी झोप न लागणे, लॅपटॉपसमोर तासनतास काम करणे इत्यादींमुळे ही समस्या आणखी वाढते. मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका भागात दुखते, डोळे जड होतात, उलट्या होतात, चक्कर येते अशी लक्षणे जाणवतात. वातावरणातील वाढत्या दाबवामुळे पावसाळ्यात मायग्रेनचा त्रास वाढण्याची शक्यता असते यासोबतच या ऋतूमध्ये आर्द्रता अधिक वाढते, त्यामुळे जीवाणु आणि बुरशीचा संसर्गाचा धोकाही वाढतो, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. याशिवाय धुळीची अ‍ॅलर्जी असल्यानेही व्यक्तीच्या मायग्रेनची समस्या वाढते. संतुलित आहार, निरोगी जीवनशैलीने मायग्रेनचे दुखणे नियंत्रणात ठेवता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरपूर पाणी प्या
पावसाळ्यात आर्द्रता वाढते, त्यामुळे डिहाइड्रेशन होते. म्हणूनच पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे. दिवसातून किमान आठ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा त्रास होतो. पाण्याव्यतिरिक्त तुम्ही ज्यूस आणि सूप यांसारखे द्रव पदार्थही घेऊ शकता. पण, आपल्या मायग्रेनला चालना देणाऱ्या कोणत्याही द्रव पदार्थांपासून दूर रहा.

हेही वाचा – मेटाबॉलिजम कशामुळे प्रभावित होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या तुम्ही काय केले पाहिजे?

घरातील वातावरण नियंत्रित करा

मायग्रेनचा त्रास वाढत नाही, त्यामुळे घरातील वातावरणावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरात डिह्युमिडिफायर किंवा एअर कंडिशनर वापरा. हे हवेतील आद्रतेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करेल, तसेच बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग कमी करेल. त्याच वेळी, बाथरूम आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा जेणेकरून कोणतेही जीवाणु आणि बुरशीजन्य संसर्ग होणार नाहीत.

एक दिनचर्या तयार करा
मायग्रेनचा त्रास वाढू नये म्हणून एक दिनचर्या करा आणि त्याचे पालन करा. योग्य वेळी झोपा, संतुलित आहार घ्या आणि तणावमुक्त राहा. जीवनशैलीत बदल केल्याने पावसाळ्यात मायग्रेनची शक्यता कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा – वजनही कमी करायचे अन् गोडही खायचे? मग हे ५ सुपर फूड्स खा, हेल्दी राहा

ट्रिगर ओळखा आणि टाळा
पावसाळ्यात मायग्रेनची कारणे ओळखा. त्यांना ओळखल्यानंतर तुमच्या जीवनशैलीत आवश्यक बदल करा. यामध्ये तीव्र वास, काही खाद्यपदार्थ यांचा समावेश असू शकतो, ज्यामुळे वारंवार मायग्रेन होतात. ट्रिगर्स टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migraine can increase in rainy season know simple solutions to prevent it snk
Show comments