अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण त्यांच्या उत्तम फिटनेससाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. वयाच्या ५५ व्या वर्षीही एखाद्या तरूणाला लाजवेल असा त्यांचा फिटनेस असल्याने त्यांचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे. अभिनेता आणि सुपर माॅडेल मिलिंद सोमण नेहमीच त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून फिट राहण्याचा सल्ला देत असतात. असाच सल्ला देतानाचा एक व्हिडिओ त्यांनी नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फक्त फिटनेसच नाही तर त्यासोबत आपल्यासाठी यश म्हणजे काय? यावर त्यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले भाषणात?

पारूल विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना सोमण म्हणाले की “प्रत्येकासारखीच माझी पण यशाची कॉमन व्याख्या होती. ज्यामध्ये पैसा, प्रसिद्धी, स्टेटस ह्या गोष्टी होत्या. या गोष्टी मी माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी मिळवल्या आहेत. पण खेळातील, अभिनय क्षेत्रातील, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रातील अनेक लोकांना भेटल्यावर, अनेक देशातील वेगवेगळे अनुभव घेतल्यानंतर माला उमगलं की, आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या यशाच्या व्याखेत बसत नाहीयेत. आज माझ्यासाठी यश म्हणजे आरोग्य आणि आनंद हे आहेत.” स्वत:चा यशाचा अर्थ शोधण्यासाठी काय करायला हवं हे सांगताना ते म्हणाले, “प्रत्येकाने स्वतःच्या आतमध्ये झाकून बघा आणि शोधा की स्वतःसाठी यश म्हणजे नक्की काय आहे? मला माहितेय तुम्हाला, मला आणि आपल्या प्रत्येकाला लहानपणापासून सांगण्यात आलं आहे की, अमुक अमुक गोष्ट म्हणजे यश आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीसारखं बनायचं असत आणि तसं बनवल्यावर आपण यशस्वी होतो हे सुद्धा सागितलं जात.”

सर्व्हेनुसार अनेकांसाठी आरोग्य आणि कुटुंब म्हणजे यश

मिलिंद सोमण यांनी त्यांच्या भाषणात एका सर्व्हेबद्दलही सांगितल. ते म्हणाले, “गेल्या वर्षी अमेरिकेत एक सर्व्हे घेण्यात आला होता. ज्यामध्ये अनेकांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य आहे याबद्दल दिलेल्या यादीतून निवड करायची होती. करियर, पैसा, जॉब, आरोग्य, कुटुंब, प्रसिद्धी अशा अनेक गोष्टींच्या यादीतून सर्वाधिक लोकांनी आरोग्य आणि कुटुंब याची निवड केली.”

Story img Loader