Milk For Diabetic Patient: केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना मधुमेहाचा त्रास होत आहे. मधुमेह हा आजार आता सामान्य बनत चालला आहे. एखाद्याला हा आजार झाला की काय खावे आणि काय खाऊ नये ही त्याची सर्वात मोठी चिंता असते. जर तुम्ही काही चुकीचे खाल्ले तर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. अशा परिस्थितीत किडनी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. भारतातील प्रसिद्ध आहारतज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, जर आपण ३ गोष्टी दुधात मिसळून प्यायल्या तर ग्लुकोजची पातळी कायम नियंत्रणात राहते.
‘या’ गोष्टी दुधात मिसळा
दूध आणि दालचिनी (Milk and Cinnamon)
दालचिनी हा एक अतिशय चवदार मसाला आहे, जो प्रत्येक भारतीयांच्या घरात दिसून येईल. तो मधुमेहाच्या रुग्णांनी वापरला पाहिजे कारण त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे सोपे होते. हा मसाला दुधात मिसळून प्यायल्याने आरोग्य चांगले राहते.
दूध आणि बदाम (Milk and Badam)
दूध आणि बदाम यांचे मिश्रण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, दुधामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. दुसरीकडे, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, प्रोटीन आणि फायबर बदामामध्ये आढळतात. कमी कॅलरीजमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच दररोज एक ग्लास बदामाचे दूध प्यावे.
( हे ही वाचा: डायबिटीज होण्याआधी सकाळी शरीरात दिसतात ‘ही’ ४ गंभीर लक्षणे; वेळीच ओळखा नाहीतर..)
दूध आणि हळद ( Milk and Turmeric)
थंडीच्या दिवसात गरम हळद दूध प्यावे असा सल्ला आपल्याला डॉक्टरही देतात. हळद सर आजारांवर गुणकारी आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. यात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे इन्सुलिनची पातळी राखली जाते आणि त्याच वेळी रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील नियंत्रणात राहते.
( हे ही वाचा: डायबिटीज रुग्णांसाठी ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान? काजू बदाम खाल्ल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल)
मधुमेहामध्ये दूध कोणत्या वेळी प्यावे? दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती
आहारतज्ञ आयुषी यादव यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यादरम्यान दुधाचे सेवन केले पाहिजे कारण यामुळे कार्बोहायड्रेट्सचे पचन मंदावते आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यात समस्या निर्माण होत नाही.