जर तुमच्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागली तर समजून घ्या की तुमाला येणाऱ्या काळात स्ट्रोक आणि हृदयविकाराचा गंभीर धोका उद्भवू शकतो. हा धोका आधीच ओळखून आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये त्वरित बदल करणे चांगले ठरेल. अनेकजण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतात. अशा परिस्थितीत, कोलेस्ट्रॉल वाढल्यास दूध पिणे बंद करावे का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलेस्टेरॉलबद्दल अनेक गैरसमज आहेत जे दूर करणे फार महत्वाचे आहे. कोलेस्टेरॉल वाढल्यावर बरेच लोक दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहतात. परंतु असे केल्याने आपल्या आरोग्याला हानी पोहचू शकते. आज आपण जाणून घेऊया कोलेस्टेरॉल वाढल्यावर दुधाचे सेवन करणे योग्य आहे की नाही.

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ‘ही’ आहे झोपेची योग्य वेळ; आजच सवयीमध्ये करा बदल

कोलेस्टेरॉल म्हणजे फक्त चरबी नसते. हा एक प्रकारचा लिपिड आहे जो चरबी आणि प्रथिनांनी बनलेला असतो. हा एक चिकट पदार्थ आहे जो रक्तात निरोगी पेशी तयार करण्यास मदत करतो. एचडीएल म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. दुसरीकडे, जर एलडीएल शिरांमध्ये जास्त जमा झाले तर हृदयविकाराचा झटका यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. साधारणपणे, आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. आपण फक्त चांगले कोलेस्टेरॉल वापरणे चांगले आहे.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, दूध प्यायल्याने कोलेस्टेरॉलच्या पातळीवर विशेष परिणाम होत नाही. त्याचा सविस्तर अभ्यास केल्यावर असे आढळून आले की दुग्धजन्य पदार्थांमुळे चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी चहा पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

संशोधनात असेही समोर आले आहे की जे लोक नियमित दूध पितात त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोका १४ टक्क्यांनी कमी होतो. दूध मर्यादित प्रमाणात प्यायल्यास पोटाची चरबी किंवा वजन वाढत नाही. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की कोलेस्ट्रॉल वाढल्यास दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करण्याची गरज नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk consumption can increase risk of bad cholesterol know what is truth pvp