Healthy Tips: चहा हा प्रत्येकाच्या आवडीचा असतो. सकाळी उठल्या उठल्या दुधाचा कडक चहा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात होत नाही. चहा प्रेमींचे तर दिवसातून तीन ते चार कप चहा सहज होऊन जातात. पण, हा दुधाचा चहा आरोग्यासाठी किती चांगला आहे आणि किती वाईट, यावरून अनेकदा वाद होतात. चला तर मग आज जाणून घेऊया दुधाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे आणि हानी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुधाच्या चहाचे फायदे आणि दुष्परिणाम ( Milk Tea Benefits And Side Effects)

दुधाच्या चहाचे फायदे

  • जर आपण दुधाच्या चहाच्या फायद्यांबद्दल बोललो तर, हा चहा पिल्याने शरीराला चांगली ऊर्जा मिळते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते कारण चहा प्यायल्यानंतरच त्यांना कोणतेही काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा जाणवते.
  • डोकेदुखी दूर करण्यासाठी दुधाचा चहा असरदार मानला जातो. याचे एक कारण म्हणजे त्यात आले असते आणि आले वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • तणाव कमी करण्यासाठी देखील दुधाच्या चहाचे फायदे देखील दिसून आले आहेत. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणारी माणसांच्या हातात वेळोवेळी चहाचा कप दिसतो.
  • दुधाच्या चहाला मूड लिफ्टर देखील म्हटले जाऊ शकते. दुधाची चहा प्यायल्याने मूड पूर्वीपेक्षा चांगला होऊ शकतो.

( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी किती असायला हवी? हृदयासाठी ‘ही’ पातळी ठरू शकते धोकादायक)

दुधाच्या चहाचे शरीराला होणारे नुकसान

  • दुधाच्या चहामुळे शरीराला होणारे नुकसानही आहेत. दुधाच्या चहाचे सर्वाधिक सेवन केल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते.
  • दुधाच्या चहामुळे छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे पोट फुगणे आणि मळमळ देखील कधीकधी जाणवते.
  • सकाळी लवकर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
  • दुधाच्या चहाच्या अतिसेवनाने शरीरातील उरलेल्या पोषक तत्वांमध्ये व्यत्यय येतो. शरीराला इतर घटक शोषून घेणे कठीण जाते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milk tea benefits and side effects know from the expert gps