नाताळचा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परदेशात हा सण जास्त प्रमाणात साजरा केला जात असला तरीही भारतासारख्या सर्वधर्मसमभाव असणाऱ्या देशातही या सणाचे विशेष महत्त्व आहे. दिवाळीत आपण ज्याप्रमाणे घराची सजावट करतो तशीच सजावट नाताळमध्येही केले जाते. जवळ आला आहे आणि या दिवसांत आपल्यापैकी बहुतेक जण घरात सुंदर सजावट करतात. आर्ट आणि क्राफ्ट या ब्रँडतर्फे नाताळच्या सजावटीसाठी विविध संकल्पना व कृती सांगण्यात आल्या आहेत. या संकल्पना खिशाला परवडणाऱ्या असल्याने तुमच्या खिशाला फारसा ताणही पडणार नाही. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूही घरात सहज उपलब्ध असतात. या दिवसांत लहान मुलांना शाळेला सुटी असते. त्यामुळे लहानग्यांच्या कलेला वाव देणाऱ्या, त्यांना रमवतील अशा गोष्टी करुन घर सजवता आले तर? विकत आणलेल्या वस्तूपेक्षा हाताने बनवलेली भेटवस्तू कधीही जास्त आनंद देणारी असते. तेव्हा यंदाच्या नाताळची सजावट आकर्षक बनवण्यासाठी आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देऊया…
१. रेनडियर आय मास्क
साहित्य – जाड ओएचपी शीट, ए फोर कागद, पेन्सिल, सिंगल पंच, चंदेरी रिबन/इलॅस्टिक, कात्री
कृती
पायरी १ – आउटलाइन काढणे
-ए फोर आकाराच्या कागदावर ख्रिसमसच्या दिवसांची आठवण करून देणाऱ्या रेडडियरसारख्या आय मास्कचे चित्र काढा.
-या चित्रावर ओएचपी शीट ठेवा आणि डिझाइन थ्रीडी डी आउटलायनर नॉन स्टिकी ग्लिटर सिल्व्हर ४०२ ने ठळक काढून घ्या.
-सुकण्यासाठी ठेवा.
पायरी २ – मास्क रंगवणे
-आय मास्क फेव्हिक्रिल वॉटर बेस्ड ग्लास कलर्स किट टोमॅटो रेड, ब्राउनने रंगवा.
-सुकण्यासाठी ठेवा
पायरी ३ – मास्क कापणे आणि जुळवणे
-कात्रीने मास्क आउटलाइनवरून व्यवस्थित कापून घ्या.
-फोटोचा संदर्भ घ्या.
-सुकल्यानंतर विरूद्ध बाजूंनी भोक पाडून त्यात रिबन किंवा इलॅस्टिक नीट बांधून घ्या.
२. कँडी स्टिक सँटा फोटो फ्रेम
साहित्य – कँडी स्टिक्स, कात्री, कापूस, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे
कृती
पायरी १ – स्टिक फ्रेम बनवणे
– फ्रेमसाठी सँटा टोपी बनवण्यासाठी कँडी स्टिक्स एकापेक्षा एक कमी आकारात कापा.
-सर्व स्टिक्स एकत्र जोडून सँटाची त्रिकोणी टोपी बनवा आणि फोटो लावण्यासाठी फॅब्रिक ग्लूने चौकोनी फ्रेम बनवा. -सुकण्यासाठी ठेवा.
-टोपी आणि चौकोनी फ्रेम फॅब्रिक ग्लूने एकत्र चिकटवा. सुकण्यासाठी ठेवा.
-अशा तीन फ्रेम्स बनवा.
पायरी २ – फ्रेम रंगवा
-अक्रेलिक कलर पर्ल व्हाइट ३०१ ने फ्रेम्स रंगवा
– सुकण्यासाठी ठेवा.
पायरी ३ – फ्रेम रंगवा
-सँटाच्या टोपीवर काही हॉलीज रंगवा.
-हॉलीज आणि सँटाच्या टोपीची आउटलाइन थ्रीडी आउटलायनर ग्लिटर सिल्व्हर ४०२ ने रंगवा. सुकण्यासाठी ठेवा.
-टोपी, हॉलीज आणि चौकोनी फ्रेम वॉटर बेस्ड ग्लास रंगांनी रंगवा. टोमॅटो रेड, ब्राउन, क्रिस्टल ग्रीन
-सुकण्यासाठी ठेवा.
पायरी ४ – कापूस चिकटवणे
-थोडा कापूस घेऊन सँटाच्या टोपीसाठी दाढी आणि पॉम- पॉम्स बनवा.
-फॅब्रिक ग्लूने टोपीवर दाढी आणि पॉम- पॉम्स चिकटवा.
-सुकण्यासाठी ठेवा.
पायरी पाच
-फोटोग्राफ घेऊन तो फॅब्रिक ग्लूच्या मदतीने फ्रेमच्या मागील बाजूस चिकटवा.
-सुकण्यासाठी ठेवा.
या सँटा फोटोफ्रेम्स तुमच्या मुलांच्या खोलीत ख्रिसमस सजावट म्हणून लावा.
3. फॅब्रिक पेंटिंग
साहित्य – एम्ब्रॉयडरीची लाकडी रिंग, जुना टी- शर्ट, पांढरा कागद, पिवळा कार्बन पेपर, ए ४ हिरवा आणि फिकट हिरव्या रंगाचे कार्ड पेपर्स, सोनेरी धागा, पाइन कोन्स, थर्माकोल बॉल्स, फुले बनवण्यासाठी वापरली जाणारी वायर (चंदेरी रंग), डॉलीज, लीफ पंच, कात्री, पेन्सिल, रंगांची पॅलेट, पाण्याचे भांडे, ग्लू गन.
कृती
पायरी १ – जुना टी- शर्ट रिसायकल करणे
-जुना, फिकट रंगाचा टी- शर्ट घ्या
-१२ इंची परिघ असलेली एम्ब्रॉयडरी रिंग घ्या
-टी- शर्टची प्लेन बाजू रिंगच्या आकारात कापा.
-टी- शर्ट रिंगमध्ये अडकवा.
पायरी २ – डिझाइन काढणे
-रिंगच्या आकाराचा पांढरा कागद घ्या. त्यावर ‘मेरी ख्रिसमस’ असे लिहा.
-हे शब्द टी- शर्ट बेसवर पिवळ्या कार्बन पेपरच्या मदतीने ट्रेस करा.
पायरी ३ – डिझाइन रंगवणे
-मेरी ख्रिसमस’ हे शब्द फॅब्रिक रंग मरून , कोरल रेडने रंगवा.
-सुकण्यासाठी ठेवा
पायरी ४ – रेथची जुळणी करणे
-पाइन कोन घ्या, फेव्हिक्रिल कलर पर्ल मेटॅलिक गोल्ड ३५२ ने रंगवा. सुकण्यासाठी ठेवा.
-हिरवा आणि फिकट हिरव्या रंगाचा कार्ड पेपर घ्या, त्यातून काही पानांचे आकार काढून कापून घ्या, लीफ पंच वापरून यातली काही पाने पंच करा.
-डॉलीज घ्या व त्याचे डिझाइन थ्री डी आउटलायनर ग्लिटर सिल्व्हर ४०२ ने सुशोभित करा. सुकू द्या.
-त्याच पद्धतीने थर्माकोलचे गोळे घेऊन ते चेरीसारखे दिसावेत म्हणून कोरल रेड २६६ ने रंगवा.
-फुले बनवण्याच्या वायरला या चेरीच जोडा आणि चेरीच्या घोसाचा आभास तयार करा.
-रंगवलेला पाइन कोन, सोनेरी धागा, पाने, डॉलीज, चेरीजचा घोस एकत्र करून रिंगच्या भोवती रेथला असतात त्याप्रमाणे ग्लू गन व फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने चिकटवा.
-सुकण्यासाठी ठेवा.