Reasons for Missed periods : मासिक पाळी ही महिलांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यातून त्यांना दर महिन्याला जावे लागते. यादरम्यान मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही मुलींसाठी महिन्यातील हे दिवस अत्यंत वेदनादायी असतात. कधी ओटीपोटात दुखणे, मूड बदलणे यांसारख्या समस्यांमुळे अनेक मुलींना पीरियड्सचे दिवस त्रासदायक असतात. पण कधी कधी काही मुलींना नियमित पाळी येत नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात. मासिक पाळी चुकण्यामागे प्रेग्नेंसी हे एक लक्षण असते, परंतु काही वेळा ही गंभीर समस्या किंवा आजाराचे कारण देखील असू शकते. व्हेरिवेल हेल्थच्या मते, मासिक पाळीचे चक्र सुमारे २८ दिवसांचे असते. काहींचे हे चक्र ३८ दिवसांपर्यंतही वाढू शकते. पण हे चक्र या दिवसांपेक्षा जास्त होत असेल तर पाळी उशिरा येते असे मानले जाऊ शकते. यामुळे पाळी उशिरा येत असल्याने किंवा पाळी येतच नसल्याने तुम्ही काळजीत असाल तर त्यामागची काही महत्त्वाची कारणं जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियमित मासिक पाळी न येण्याची काही संभाव्य कारणे-

१) ताण

क्लीव्हलॅण्ड क्लिनिकच्या मते, तणावाखाली असताना, तुमचे शरीर कोर्टिसोल तयार करते. तुमचे शरीर तणाव कसे सहन करते यावर कोर्टिसोलची पातळी अवलंबून असते. यामुळे कोर्टिसोलमुळे पाळी उशिरा येते, पाळी आली तर कमी रक्तस्राव होतो किंवा मासिक पाळी येतच नाही. जर तुम्ही खूप तणावाखाली असाल शरीर एका वेगळ्या मूडमध्ये असते, ज्यामुळे तात्पुरते ओव्हुलेशन थांबवू शकते. ओव्हुलेशनच्या या कमतरतेमुळे मासिक पाळीत अडथळे येतात, असे हेल्थलाइनने म्हटले आहे.

२) पटकन वजन कमी होणे किंवा वाढणे.

हेल्थलाइनच्या मते, शरीराच्या वजनात मोठे बदल झाल्यामुळे सेकेंडरी एमेनोरियाचा धोका वाढतो. ज्याचा अर्थ तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ तुम्हाला मासिक पाळी येत नसेल तर या स्थितीला सेकंडरी एमेनोरिया म्हटलं जातं. हे सामान्य असेल तरी यामुळे तुमच्या BMI (बॉडी मास इंडेक्स) मध्ये वेगाने बदल होतो. शरीरातील चरबीमध्ये कमालीची वाढ किंवा घट झाल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे तुमची मासिक पाळी उशिरा येते किंवा पूर्णपणे थांबते.

३) खूप व्यायाम

नियमित ठरावीक व्यायाम केल्याने मासिक पाळी थांबत नाही, परंतु खूप जास्त वेळ व्यायाम केल्याने रोजपेक्षा जास्त कॅलरीज घटतात त्यामुळे अनेकदा मासिक पाळी येत नाही. जेव्हा तुम्ही खूप कॅलरीज घटवता, तेव्हा तुमच्या शरीरात सिस्टम चालू ठेवण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसते. यामुळे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात, ज्यामुळे तुमची मासिक पाळी बंद होते, चुकते किंवा उशिराने येते, अशी माहिती हेल्थलाइनने दिली आहे.

४) असुरक्षित लैंगिक संबंध

मासिक पाळीदरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता असते. हे देखील मासिक पाळी न येण्याचे सामान्य कारण असते. हेल्थलाइनच्या मते, ओव्हुलेशन हा एक काळ असतो जेव्हा स्त्रीच्या अंडाशयातून गर्भाधारणेसाठी अंडे सोडले जाते. गर्भाशयात शुक्राणू उपलब्ध असल्यास गर्भधारणा होऊ शकते. ओव्हुलेशन कालावधी दरम्यान असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास मासिक पाळी येत नाही, अशा वेळी गर्भवती होण्याची शक्यता वाढू शकते.

हेही वाचा : अनियमित मासिक पाळी ही महिलांची मोठी समस्या आहे. पण ही समस्या का उद्भवते आणि यामागची कारणे काय आहेत जाणून घेऊ…

५) हार्मोन्सचे असंतुलन

वेबएमडीच्या मते, तुमच्या शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळीत होणारे बदल तुमच्या मासिक पाळीच्या सामान्य पद्धतीमध्ये अडथळा आणू शकतात. थायरॉइड, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि इतर वैद्यकीय परिस्थितींमुळे होणारे हार्मोन्स बदल मासिक पाळी उशिरा किंवा चुकण्यास कारणीभूत ठरू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Missed period reason these the possible reason for missed periods other the pregnancy sjr
Show comments