ताब्याच्या भांड्यातील पाणी हे अनेक रोगांना शरीरापासून दूर ठेवून आरोग्य चांगले ठेवते, असे बोलल्या जाते. आयुर्वेदातही या धातूचा वापर अत्यंत उपयुक्त मानला जातो. मात्र, तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा फायद्या एवजी हे पाणी नुकसानकारक ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून लोक मोकळे होतात. मात्र ते किती वेळ ठेवावे यालाही मर्यादा आहे. तसेच, काही लोक पाण्याची पूर्ण बाटलीच संपवून टाकतात जे नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे, तांब्याच्या बाटलीतले पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जे पुढील प्रमाणे आहे.

(इम्युनिटी वाढवण्यात मदत करतो आवळा, फक्त खाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा)

तांब्याच्या भांड्यात अनेक तास पाणी ठेवणे

तांब्याच्या भांड्यात बरेच तास पाणी ठेवू नये, ते आरोग्याला धोकादायक ठरू शकते. लोक अधिक फायदा मिळेल यासाठी हे कृत्य करतात. मात्र, हे चुकीचे आहे. पाणी काही मर्यादित कालावधीसाठीच भांड्यात ठेवावे. पाणी ६ तासांसाठीच तांब्याच्या भांड्यात ठेवावे, असे सांगितले जाते.

अधिक पाणी पिणे

लोक तांब्याच्या बाटलीत पाणी भरतात, मात्र ते थोडे थोडे पिण्याएवजी पूर्णच संपवून टाकतात. असे करणे चुकीचे आहे. पाणी थोडे थोडे प्यावे आणि एकावेळी त्याची मात्रा अधिक असू नये, असे आयुर्वेदमध्ये देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे, पाणी पिताना एकावेळी पूर्ण पाणी पिवू नये.

(‘या’ डाळीच्या सालीत दुधापेक्षा ६ पट अधिक कॅल्शियम; अभ्यासातून आश्चर्यकारक माहिती समोर)

रात्री पाण्याचे सेवन

जुन्या काळी लोक तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायचे. ते पाणी रात्री भांड्यात ठेवून द्यायचे आणि सकाळी प्यायचे, मात्र आजकाल त्याचे विरुद्ध होतानाचे दिसत आहे. लोक आरोग्य चांगले राहील या समजाने कधीही तांब्यातील भांड्यातले पाणी पितात. असे पाणी रात्री शरीरात रिअॅक्शन निर्माण करू शकते, असे एक्सपर्ट सांगतात. त्यामुळे, केव्हाही या पाण्याचे सेवन करू नये.

अॅसिडिटीमध्ये पाणी पिणे

ज्या लोकांना अॅसिडिटी आहे त्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे. अॅसिडिटी असलेल्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास ते त्यांना नुकसान पोहचवू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पोट खराब होणे किंवा उलट्या होणे या समस्या होऊ शकतात.

(संपूर्ण लाभ मिळण्यासाठी कधी खावे खजूर? जाणून घ्या)

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, मात्र नुकसान एवजी त्याचे फायदे मिळवण्यासाठी ते प्रमाणात पिणे, तसेच त्यास मर्यादित कालावधीसाठी भांड्यात ठेवणे गरजेचे आहे. केवळ आरोग्य चांगले राहील यासाठी गटागट पाणी पिणे किवा आजार असताना तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यास पिणे हे आरोग्य खराब करू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mistakes people do while drinking water in copper vessel and utensils ssb