मोबाईल फोनचा वापर आणि मेंदूच्या कॅन्सरचा संबंध नाही, असे इंग्लंडच्या इन्स्टीट्यूट ऑफ कॅन्सरने केलेल्या परीक्षणातून आढळले आहे. परीक्षणानुसार मोबाईल फोनचा वापर आणि मेंदूच्या कॅन्सरचा काहीही संबंध नसल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. जगभरात मोबाईल फोनचा वापर वाढूनही ट्यूमर होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली नाही.
एनवायरनमेंट हेल्थ परस्पेक्टिवज या पत्रिकेत छापून आलेल्या आयसीआरच्या रिपोर्टनुसार, मोबाईल वापरणे आणि कॅन्सर होणे या विषयावरील अध्ययनात काही त्रुटी राहिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी मोबाईल फोन वापरल्यानं कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं. मोबाईल फोनचा वापर आणि कॅन्सर यांचा संबंध तपासण्यासाठी एक महत्वाचं अध्ययन करण्यात आलं. यासाठी २७०८ रूग्णांची तुलना अशा लोकांशी करण्यात आली ज्यांना मेंजूचा कॅन्सर नव्हता.

Story img Loader